Home /News /sport /

IND vs SA : ...त्यामुळे सहावा गोलंदाज म्हणून Venkatesh Iyer चा विचार, KL Rahul ने सांगितले कारण

IND vs SA : ...त्यामुळे सहावा गोलंदाज म्हणून Venkatesh Iyer चा विचार, KL Rahul ने सांगितले कारण

Venkatesh Iyer

Venkatesh Iyer

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान (India vs South Africa) तीन सामन्यांची वन डे सीरिज आजपासून सुरू होत आहे. कॅप्टन के एल राहुल (New caption Team India KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली टिम इंडिया 3 सामन्यांची वन डे सीरिज जिंकण्याचा प्रयत्न करेल.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 19 जानेवारी: भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान (India vs South Africa) तीन सामन्यांची वन डे सीरिज  आजपासून सुरू होत आहे. कॅप्टन के एल राहुल (New caption Team India KL Rahul) याच्या नेतृत्वाखाली टिम इंडिया 3 सामन्यांची वन डे सीरिज जिंकण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, सामन्यापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्लेइंग इलेव्हनविषयी सूचक वक्तव्य केले. आजपासून भारताच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा केलाय. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. दरम्यान, मॅचपूर्वी मीडियाशी बोलताना राहुलने अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरबद्दल(Venkatesh Iyer) भाष्य केले. 'व्यंकटेश अय्यरसारखा अष्टपैलू खेळाडू संघासाठी नेहमीच महत्त्वाचा असतो, जो संघाला आवश्यक संतुलन साधण्यास मदत करतो. त्याने अलिकडेच न्यूझीलंडविरूद्धच्या काही सामन्यात आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. '' अशा शब्दात राहुलने त्याच्या खेळीच कौतुक केले. तसेच, भारतीय संघाचा सहावा गोलंदाज कोण असेल या उपस्थित केलेल्या प्रश्नावरही त्याने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, त्यावर विचार झाला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची आवश्यकता असते. सहा गोलंदाज खेळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता संघात व्यंकटेश अय्यर आला आहे. आम्ही त्याला ती संधी देऊ. असे सूचक वक्तव्य त्याने यावेळी केले. व्यंकटेश अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांमध्ये तीन षटके टाकली होती आणि 12 धावांत एक बळी घेतला होता. तसेच खालच्या फळीत फलंदाजीही केली होती. तीन सामन्यांत 128.57 च्या स्ट्राइक रेटने 36 धावा केल्या. तर आयपीएल 2021 मध्ये त्याने कोलकात्यासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली होती. व्यंकटेशने 10 सामन्यांत 41.11च्या सरासरीने 370 धावा केल्या होत्या. तसेच तीन बळी घेतलेले. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफीत तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Kl rahul, South africa

    पुढील बातम्या