India vs South Africa : आफ्रिकेच्या खेळाडूंचा मैदानावरच राडा! एकमेकांना शिव्या घातल्याचा VIDEO VIRAL

India vs South Africa : आफ्रिकेच्या खेळाडूंचा मैदानावरच राडा! एकमेकांना शिव्या घातल्याचा VIDEO VIRAL

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 601 धावांवर डाव घोषित केला.

  • Share this:

पुणे, 11 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 601 धावांवर डाव घोषित केला. यात विराटनं सर्वोश्रेष्ठ अशी 254 धावांची कामगिरी केली आहे. विराटच्या द्विशतकासह भारतानं आफ्रिकेसमोर तब्बल 601 धावांचा डोंगर उभा केला आहे.

दरम्यान, पहिल्या दिवशी भारतानं 273 धावा केल्या. तर, दुसऱ्या दिवशी विराट आणि रहाणे यांच्या शतकी भागिदारीनं भारताचा डाव पुढे सरकरला. विराटनं 10 महिन्यांनंतर शतकी कामगिरी केली तर, रहाणे 58 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराटनं जडेजासोबत विक्रमी अशी 225 धावांची भागिदारी केली. जडेजा 91 धावांवर बाद झाला, त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात पहिल्या डावात निर्निवादपणे भारताचे वर्चस्व राहिले. पहिल्या दिवशी आफ्रिकेच्या गोलंदाजांनी रोहितला लवकर बाद केले, मात्र त्यानंतर त्यांना कमबॅक करता आला नाही. दरम्यान या सगळ्यात मैदानात एक भलताच प्रकार पाहायला मिळाला. आफ्रिकेच्या संघातील दोन खेळाडूंमध्ये मैदानावरच राडा पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-कसोटी क्रिकेटचा नवा 'डॉन', दिग्गजांचे रेकॉर्ड तोडत विराटची दादागिरी

आफ्रिकेकडून कागिसो रबाडानं त्यातल्या त्यात चांगली गोलंदाजी केली. मात्र त्याला विकेट मिळत नसल्यानं मैदानात त्याची चिडचिड झाली. यातच रबाडा गोलंदाजी करत असताना फलंदाजाला धाव काढता येऊ नये म्हणून आक्रमक झालेल्या रबाडानं चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला. पण चेंडू थेट यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककडे गेला. रबाडा चेंडू फेकेल अशी डी कॉकला अपेक्षा नव्हती. त्यामुळे तो चेंडू त्याच्याकडून सुटला आणि भारताने एक चोरटी धाव घेतली. या प्रकारानंतर रबाडा आणि डी कॉक यांच्यात शाब्दिक चकमक दिसून आली.

वाचा-विराटचा डबल धमाका! द्विशतकासह अनोखा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

भारतानं उभारलेला धावांचा डोंगर सर करण्यासाठी आफ्रिकेच्या गोलंदाजांनाच चांगली कामगिरी करावी लागणार आहे. मात्र, आफ्रिकेनं पहिल्या डावातच दोन विकेट गमावल्या त्यामुळं त्यांचा संघ सध्या दडपणाखाली आहे.

वाचा-VIDEO : अरेरे! पराभवानंतर भडकला पाकचा चाहता, कर्णधाराला लाथा-बुक्क्यांनी धुतलं

VIRAL VIDEO : धडधडत येणाऱ्या ट्रेनखाली आपणहून सरपटत गेला साप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2019 04:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading