India vs South Africa : खेळाडूंचा पासिंग द पार्सल! क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात विचित्र कॅच, पाहा VIDEO

भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघात झालेली एकदिवसीय मालिका भारतानं 3-0नं जिंकली.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 07:46 PM IST

India vs South Africa : खेळाडूंचा पासिंग द पार्सल! क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात विचित्र कॅच, पाहा VIDEO

वडोदरा, 14 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पार पडली. यातील अंतिम एकदिवसीय सामना आज वडोदरा येथे पार पडला. दरम्यान, या सामन्यात शानदार खेळी करत 6 धावांनी भारतीय संघानं विजय मिळवत 3-0नं ही मालिका आपल्या खिशात घातली.

या सामन्यात एकावेळेस दक्षिण आफ्रिकेचा संघ मजबूत स्थितीत दिसत होता. जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची असताना आफ्रिका संघानं 3 विकेट गमावल्या. अशा प्रसंगी कर्णधार मिताली राजनं आपली स्टार फिरकी गोलंदाज एकता बिष्टच्या हाती चेंडू सोपवला. एकतानं आपल्या चौथ्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या नोडूमिसो शानघासेला विचित्र कॅच घेत बाद केले.

एकतानं आपल्या चेंडूला फ्लाईट देत, नोडूमिसोला स्ट्रेट शॉट लगावण्यात भाग पाडले. शानघासेच्या फलंदाजीमधून निघालेला जबरदस्त शॉटला अडवणे कठिण होते. मात्र एकताच्या हाताला चेंडू लागला आणि चेंडू उडत मिड ऑफमध्ये उभ्या असलेल्या दिशेनं गेला.

वाचा-संघात जागा मिळाली नाही म्हणून 'हा' स्टार खेळाडू चालवतोय पिक-अप ट्रक, VIDEO VIRAL

मिड ऑफला फिल्डिंग करत असलेल्या मानसी जोशीनं अगदी वेळेत हा झेल घेत, मोक्याच्या क्षणी भारताला कॅच मिळवून दिला. त्यामुळेच भारताला विजय मिळाला. बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर या विचित्र कॅचचा व्हिडीओ अपलोड केला आहे.

Loading...

वाचा-भारतीय क्रिकेटमध्ये घराणेशाही, शहांच्या मुलासह 'या' मंत्र्याचा भाऊ मैदानात!

दरम्यान या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत, आफ्रिकेसमोर 146 धावांचे आव्हान ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 140 धावांवर बाद झाला. त्यामुळं भारतानं 6 धावांनी हा सामना जिंकत 3-0नं मालिकाही आपल्या खिशात घातली.

वाचा-आता दरवर्षी होणार टी-20चा थरार, क्रिकेट चाहत्यांसाठी ICCने घेतला मोठा निर्णय

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...