दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी धोनीनं घेतला करिअरमधला सर्वात मोठा निर्णय!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी धोनीनं घेतला करिअरमधला सर्वात मोठा निर्णय!

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकाविरोधात भिडणार आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकाविरोधात भिडणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. यासाठी 4 सप्टेंबरला भारतीय संघाची निवड केली जाऊ शकते. दरम्यान याआधी एमएस धोनीला संघात जागा मिळणार नसल्याचे संकेत दिले गेले होते. त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात निवड करण्यात आलेलाच संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात टी-20 मालिका खेळू शकतो. मात्र आता धोनीनं स्वत: वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळं या संघात खेळाडूंची निवड करताना टी-20 वर्ल्ड कपचा निकष समोर ठेवला जाऊ शकतो. त्यामुळं धोनीच्या निवडीवर सध्या तरी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पीटीआयला बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीस संघ टी-20 वर्ल्ड कप 2020आधी 22 टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळं निवड समिती कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे टी-20 वर्ल्ड कपच्य दृष्टीने असेल. त्यामुळं ऋषभ पंत आणि धोनी यांना संघात जागा मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात नसणार धोनी!

इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, धोनीनं स्वत: दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे. टी-20 मालिकेत धोनी भारतीय संघासोबत सामिल होणार नाही आहे. धोनीच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनी दक्षिण आफ्रिकेविरोधात संघात सामिल होणार नाही. त्यामुळं ऋषभ पंतकडे विकेटकिपींगची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात जो संघ टी-20 सामना खेळला होता, तोच संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात मैदानात उतरू शकतो.

वाचा-दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीला डच्चू? ऋषभ पंतचे स्थानही धोक्यात

म्हणून निवड समिती धोनीला संघात घेणार नाही.

पीटीआयला बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ हा 2020 टी-20 वर्ल्ड कपच्या अनुषंगानं निवड केला जाणार आहे. दरम्यान, वर्ल्ड कपनंतर धोनीनं काही काळ क्रिकेटपासून विश्रांती घेतली होती. त्यामुळं वेस्ट इंडिज दौऱ्यावर धोनीची निवड करण्यात आली नव्हती. दरम्यान या काळात धोनीनं लष्करात ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं आता क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी धोनीपुढे दक्षिण आफ्रिका दौरा होता. मात्र, धोनी या दौऱ्यातही सामिल होणार नसल्याचे चिन्ह दिसत आहे.

वाचा-ऋषभ पंतवरचा विश्वास उडाला, टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियानं सुरू केली शोधाशोध!

पंतची जागाही धोक्यात

मीडिया रिपोर्टनुसार निवड समिती टी-20 वर्ल्ड लक्षात घेता संघाची निवड करू शकते. त्यामुळं ऋषभ पंतसोबत आणखी दोन खेळाडूंना संघात जागा मिळू शकते. वर्ल्ड कप किंवा वेस्ट इंडिज दौऱ्यात पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. बेजबाबदार शॉट खेळून तो बाद होत होता. वेस्ट इंडिज विरोधात त्यानं शेवटच्या टी-20 सामन्या अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेविरोधात 2 आणखी खेळाडू संघात सामिल होऊ शकतात. यात इशान किशन आणि संजू सॅमसन यांचे नाव आघाडीवर आहे.

वाचा-‘आफ्रिदीचं फक्त वय वाढलं, अक्कल नाही’, गंभीरच्या टीकेने वस्त्रहरण!

'क्रिकेटचा देव' पोहोचला त्यांच्या भेटीला आणि कॅरमही खेळला, पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 29, 2019, 7:05 PM IST
Tags: MS Dhoni

ताज्या बातम्या