India vs South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीला डच्चू? ऋषभ पंतचे स्थानही धोक्यात

भारत-वेस्ट इंडिजनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 07:58 PM IST

India vs South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीला डच्चू? ऋषभ पंतचे स्थानही धोक्यात

मुंबई, 28 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. कसोटी सामन्यांनंतर लगेचच 15 सप्टेंबरपासून भारत विरुद्ध-दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 सामना होणार आहे. दरम्यान या मालिकेतही एमएस धोनीला संघात जागा मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात निवड करण्यात आलेलाच संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात टी-20 मालिका खेळू शकतो.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळं या संघात खेळाडूंची निवड करताना टी-20 वर्ल्ड कपचा निकष समोर ठेवला जाऊ शकतो. त्यामुळं धोनीच्या निवडीवर सध्या तरी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पीटीआयला बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीस संघ टी-20 वर्ल्ड कप 2020आधी 22 टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळं निवड समिती कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे टी-20 वर्ल्ड कपच्य दृष्टीने असेल. त्यामुळं ऋषभ पंत आणि धोनी यांना संघात जागा मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.

वर्ल्ड कपनंतर धोनीनं काही काळ क्रिकेटपासून विश्रांती घेतली होती. त्यामुळं वेस्ट इंडिज दौऱ्यावर धोनीची निवड करण्यात आली नव्हती. दरम्यान या काळात धोनीनं लष्करात ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं आता क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी धोनी दक्षिण आफ्रिकेविरोधात एकदिवसीय मालिकेत संघात सामिल होऊ शकतो

वाचा-दुसरा कसोटी सामना भारतासाठी महत्त्वाचा, पण झाला आहे एक बदल!

पंतची जागाही धोक्यात

Loading...

मीडिया रिपोर्टनुसार निवड समिती टी-20 वर्ल्ड लक्षात घेता संघाची निवड करू शकते. त्यामुळं ऋषभ पंतसोबत आणखी दोन खेळाडूंना संघात जागा मिळू शकते. वर्ल्ड कप किंवा वेस्ट इंडिज दौऱ्यात पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. बेजबाबदार शॉट खेळून तो बाद होत होता. वेस्ट इंडिज विरोधात त्यानं शेवटच्या टी-20 सामन्या अर्धशतकी खेळी केली होती.

सैयद किरमानी यांची पंतवर जहरी टीका

भारताचे माजी विकेटकिपर सैयद किरमानी यांनी ऋषभ पंतच्या खराब खेळीवर जहरी टीका केली आहे. किरमानी यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला संघात न घेतला ऋध्दीमान साहाला संघात घ्यावे असे सांगितले. एवढेच नाही तर किरमानी यांनी, “हातात ग्लोव्हज घालून कोणी विकेटकीपर होत नाही”, अशा शब्दात पंतवर टीका केली आहे. किरमानी कोलकातामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. तसेच किरमानी यांनी, “पंतकडे खेळण्याची शैली आहे मात्र, त्याला शॉट खेळताना विचार करण्याची गरज आहे. अजूनही खुप काही शिकण्याचे बाकी आहे”, असे सांगितले.

वाचा-फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या यॉर्कर किंगनं क्रिकेटसाठी सोडले होते घर!

ऋषभ पंतच्या शॉटवर उपस्थित झाले अनेक प्रश्न

अलिकडच्या काळात ऋषभ पंतच्या शॉट निवडीवर बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. विश्वचषकाच्या उपांत्य फेरी असो वा वेस्ट इंडीज विरूद्ध टी -20 आणि एकदिवसीय मालिका असो, पंतने अत्यंत खराब फटका मारून विकेट गमावली. सेहवाग याच गोष्टीला त्याची कमकूवत बाजू मानतो. पंत सध्या वेस्ट इंडिजविरूद्ध एक कसोटी मालिका खेळत आहे जिथे त्याला अँटिगा कसोटीत स्वत: ला सिद्ध करण्याची संधी आहे. तसेट, त्याने कसोटी फलंदाज म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतके केली आहेत आणि म्हणूनच त्याला ऋद्धिमान साहापेक्षा प्राधान्य दिले जाते.

भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्याच तीन टी-20 सामने होणार आहे. पहिला टी-20 सामना 15 सप्टेंबरला धर्मशाला मैदानावर खेळला जाणार आहे. तर, दुसरा टी-20 सामना 18 सप्टेंबर आणि तिसरा सामना 22 सप्टेंबरला बंगळुरूला होणार आहे.

वाचा-Sorry मानसी! एका पायावर गोल्ड मिळवूनही आम्ही तुझी दखल घेण्यास कमी पडलो

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2019 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...