पुणे, 13 ऑक्टोबर : भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वादळी कामगिरी केली आहे. मोहम्मद शमीनं चौथ्या दिवशी मुथुस्वामीला बाद करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट पूर्ण केल्या. गेल्या 6 वर्षात भारतीय संघात मॅच विनिंग कामगिरी केली आहे. एवढेच नाही तर, आपल्या स्विंग गोलंदाजीमुळं शमीला स्विंग किंग असे नावही पडले आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्यांदा ऐतिहासिक फॉलोऑन सामन्यात भारतानं विजय मिळवला. भारतीय संघानं विराट कोहलीच्य नेतृत्वाखाली पुण्यातील कसोटी मालिकेत विजय मिळवत या मालिकेवर कब्जा केल आहे. भारतानं तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-0नं आपल्या नावावर केली आहे. भारतानं दुसरा सामना एक डाव आणि 137 धावांनी जिंकला. भारताचा दक्षिण आफ्रिका विरोधातला हा सर्वात मोठा विजय आहे.
वाचा-कसोटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ‘बिग बॉस’, इतर संघांची अवस्था दयनीय!
उजव्या हाताचा गोलंदाज मोहम्मद शमीनं दक्षिण आफ्रिका विरोधातल्या दुसऱ्या डावात पहिली विकेट घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट पूर्ण केल्या. या सामन्यातील पहिल्या डावात शमीनं दोन विकेट घेतल्या होत्या. 29 वर्षीय शमीनं तेम्बा बावूमा आणि एनरिच नोर्तजे यांना आपले शिकार केले होते. तर, दुसऱ्या डावामध्ये मुथुस्वामीला बाद केले.
असा आहे शमीचा ट्रॅक रेकॉर्ड
मोहम्मद शमीनं आपल्या 300 आंतरराष्ट्रीय विकेटमध्ये 182 खेळाडूंना कॅच आऊट केले आहे. तर, 82 खेळाडूंना क्लिन बोल्ड केले आहे. तसेच, 32 विकेट फक्त एलबीडब्लु घेतल्या आहेत. असे खुप कमी गोलंदाज आहेत ज्यांनी सर्वात जास्त विकेट फलंदाजाला बोल्ड करत केल्या आहेत.
वाचा-टीम इंडिया कसोटीचा बादशाह, आफ्रिकेविरुद्धच्या विजयानं ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड!
अशा पूर्ण केल्या शमीनं 300 विकेट
2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीनं कसोटी क्रिकेटमध्ये 161 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट घेणारा शमी पहिला गोलंदाज ठरला आहे. शमीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 131 विकेट घेतल्या आहेत, यात वर्ल्ड कप 2019मध्ये घेतलेल्या एका हॅट्ट्रिकचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये शमीनं 8 विकेट घेतल्या आहेत.
वाचा-जडेजाची जादू! अपील न करताच अम्पायरनं फलंदाजाला केले बाद, पाहा VIDEO
VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात