Home /News /sport /

KL Rahul लग्न, पार्टीच्या ऑर्डर्सही घेतो; माजी क्रिकेटपटू असं का म्हणाला...

KL Rahul लग्न, पार्टीच्या ऑर्डर्सही घेतो; माजी क्रिकेटपटू असं का म्हणाला...

KL Rahul

KL Rahul

टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) यावर्षी चांगलाच फॉर्मात आहे. राहुलनं सेंच्युरियन टेस्टमध्ये शतक झळकावत त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला.

    नवी दिल्ली, 31 डिसेंबर: टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) यावर्षी चांगलाच फॉर्मात आहे. राहुलनं सेंच्युरियन टेस्टमध्ये शतक झळकावत त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. इंग्लंड दौऱ्यापासून बॅटींगमध्ये केलेला एक बदल हे यशाचे मुख्य कारण असल्याचे राहुले मॅचनंतर स्पष्ट केले. त्याच्या या खेळीनंतर त्याच्या पाठीवर क्रिकेट जगतातून कौतुकाची थाप पडत आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्‍मद कैफनेही (Mohammad Kaif) केएल राहुलचे ट्विट करत कौतुक केले आहे. पण त्याचे हे ट्विट खास ठरले आहे. कैफने, ट्विटमध्ये, केएल राहुल मला राहुल द्रविडची आठवण करुन देतो. नेहमी एक नि:स्वार्थ टीम मॅन, सलामीवीर, अतिरिक्त यष्टिरक्षक, उशीरा येणारा बॅट्समन, विश्वासार्ह स्लिप क्षेत्ररक्षक, संकटमोचक, आणि वेटिंगमधील कर्णधार. अशा शब्दात कौतुक करत मोहम्‍मद पुढे म्हणाला, केएल राहुल लग्न, पार्टीच्याही ऑर्डर्स घेतो. राहुलने सेंच्युरियनमध्ये पहिला कसोटी सामना खेळला. तो सामनावीरही ठरला. आणि शतकही (IND vs SA 1st Test) झळकावले. त्याने पहिल्या डावात 123 धावा केल्या आणि तो सामनावीरही ठरला. त्याने ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणारे बॉल सोडल्याने त्याला फायदा झाला. लॉर्ड्सवर त्याने ही पद्धत अवलंबली होती आणि शतक झळकावले होते आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियनमध्ये त्याने अशाप्रकारे यश मिळवले आहे. सामन्यानंतर केएल राहुलने मत व्यक्त केले. जसप्रीत बुमराह जेव्हा बॉलिंग करत असतो तेव्हा मला स्लिपमध्ये फील्डिंग करायला आवडते. तसेच जोपर्यंत बुमराह क्रिकेट खेळेल तोपर्यंत मला स्लिपमध्ये फील्डिंग करायला आवडेल अशी इच्छाही त्याने यावेळी व्यक्त केली.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Kl rahul, Rahul dravid, South africa

    पुढील बातम्या