मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मिताली राजने इतिहास घडवला, तेंडुलकरनंतर हा विक्रम करणारी दुसरी क्रिकेटपटू

मिताली राजने इतिहास घडवला, तेंडुलकरनंतर हा विक्रम करणारी दुसरी क्रिकेटपटू

कोरोना व्हायरसमुळे भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Womens Team) वर्षभरानंतर मैदानात उतरली. रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातल्या 5 मॅचच्या वनडे सीरिजला सुरूवात झाली.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 7 मार्च : कोरोना व्हायरसमुळे भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Women's Team) वर्षभरानंतर मैदानात उतरली. रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातल्या 5 मॅचच्या वनडे सीरिजला सुरूवात झाली. पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला बोलावलं. 364 दिवसानंतर भारतीय टीम मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वात पहिल्यांदाच मैदानात उतरली. मैदानात उतरताच मिताली राजने इतिहास घडवला.

मिताली राज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं चौथं दशक खेळत आहे. 1999 साली तिने वनडे क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याचसोबत मिताली सगळ्यात जास्त काळ वनडे क्रिकेट खेळणाऱ्या सनथ जयसूर्याच्या (Sanath Jayasurya) पुढे निघून गेली आहे. मिताली सचिन तेंडुलकरनंतर (Sachin Tendulkar) सगळ्यात मोठं वनडे करियर असणारी खेळाडू बनली आहे.

सचिन तेंडुलकरची वनडे कारकीर्द 22 वर्ष 91 दिवसांची होती. तर मिताली राजची वनडे कारकीर्द 21 वर्ष 254 दिवस आहे. सगळ्यात जास्त काळ वनडे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. जयसूर्याचं वनडे करियर 21 वर्ष 184 दिवसांचं होतं. 20 वर्ष 272 दिवसांसह जावेद मियांदाद चौथ्या क्रमांकावर आणि 19 वर्ष 337 दिवसांसोबत क्रिस गेल पाचव्या क्रमांकावर आहे.

38 वर्षांच्या मिताली राजने 26 जून 1999 साली आयर्लंडविरुद्धच्या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं. रविवारी मैदानात उतरेपर्यंत तिच्या नावावर 209 वनडे मॅचमध्ये 6,888 रन होत्या. यात 7 शतकं आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये तिचा सर्वाधिक स्कोअर नाबाद 125 रन आहे. याशिवाय तिने 10 टेस्ट आणि 89 टी-20 मॅचही खेळल्या आहेत. या मॅचआधी मितालीने शेवटची वनडे 6 नोव्हेंबर 2019 ला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती.

First published:

Tags: Cricket, Indian women's team, Mithali raj, Sachin tendulkar, Sports, Team india