India vs South Africa : इडली, चटनी आणि सांबार! भारताच्या स्टार खेळाडूनं सांगितली शतकाची रेसिपी

भारताच्या स्टार खेळाडूनं शतकी कागमरी करण्याआधी काय खातो, याचे गुपित सांगितले.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 01:11 PM IST

India vs South Africa : इडली, चटनी आणि सांबार! भारताच्या स्टार खेळाडूनं सांगितली शतकाची रेसिपी

पुणे, 11 ऑक्टोबर : क्रिकेट खेळताना खेळाडू अनेक अंधश्रध्दा पाळतात. कधी कधी शतकी खेळीनंतर तीच बॅट किंवा ते पॅड वापरणे अशा अनेक गोष्टी खेळाडू करतात. मात्र टीम इंडियाच्या स्टार खेळाडूनं आपल्या शतकाची खास रेसिपी असल्याचा खुलासा केला आहे. हा खेळाडू शतकी कामगिरी करण्याआधी फक्त 2 इडली, चटनी आणि सांबार खातो, असे त्यानं स्वत: सांगितले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात मयंकनं शतकी कामगिरी केली. पहिल्या कसोटी सामन्यात मयंकनं दुहेरी शतक केले. त्यानं 215 धावांची खेळी केली. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात 108 धावांची खेळी केली. महत्त्वाचे म्हणजे मयंकनं केवळ सहा कसोटी सामन्यात अशी कामगिरी केली आहे.

दरम्यान, सामना संपल्यानंतर चेतेश्वर पुजाराने bcct.tv साठी मयांक अग्रवालची खास मुलाखत घेतली. यावेळी तुझ्या शतकामागचं रहस्य काय? असा प्रश्न विचारला असता मयांकने, दोन इडली, चटणी आणि सांबार असे उत्तर दिलं. तसेच, मयंकनं "या शतकासह मी खुप खुश आहे. चांगले वाटते जेव्हा तुम्ही मोठी खेळी करता. माझा खेळ कसा चांगला होईल यासाठी मी सतत मेहनत करत असतो. यासाठी मानसिक संतुलन खुप महत्त्वाचे आहे", असेही मयकनं सांगितले. मयंकनं पहिल्या दिवशी पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची शतकी भागिदारी केली.

वाचा-मयंक अग्रवालचं शानदार शतक, मोडला सेहवागचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम

वाचा-304 दिवसांचा दुष्काळ संपला! विराटच्या एका शतकानं दिग्गज पिछाडीवर

तोडला सेहवागचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम

दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी कामगिरी करत मयंकनं सेहवागचा विक्रम मोडला आहे. सेहवागनं सलग दोन सामन्यात शतकी खेळी करण्याची कामगिरी केली होती, त्यानंतर मयंकने दक्षिण आफ्रिका विरोधात ही कामगिरी केली. सेहवागनं 2009मध्ये ही कामगिरी केली होती.

वाचा-विराटने संघातून वगळलेल्या खेळाडूचं वेगवान शतक, चौकार-षटकारांची आतषबाजी

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...