India vs South Africa : सलग दुसऱ्या मालिकेत धोनीला वगळले! असा आहे आफ्रिकेविरुद्धचा भारतीय संघ

India vs South Africa : सलग दुसऱ्या मालिकेत धोनीला वगळले! असा आहे आफ्रिकेविरुद्धचा भारतीय संघ

15 सप्टेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आपल्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरोधात भिडणार आहे. 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान, तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यात महेंद्रसिंग धोनी, जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच, वेस्ट इंडिज दौऱ्यात विश्रांती देण्यात आलेल्या हार्दिक पांड्याला संघात स्थान दिले आहे. बाकी संघ हा वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 सामन्यात सामिल झालेलाच आहे.

म्हणून धोनीला संघात जागा नाही

इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, धोनीनं स्वत: दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यामुळं धोनीला या मालिकेत संघात जागा देण्यात आली नव्हती. त्यामुळं ऋषभ पंतकडे विकेटकिपींगची जबाबदारी असणार आहे. धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातूनही विश्रांती घेतली होती. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपमध्येही धोनी सामिल होण्याची शक्यता कमी आहे.

वाचा-दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी धोनीनं घेतला करिअरमधला सर्वात मोठा निर्णय!

वाचा-फक्त एक विजय आणि कोहली मोडणार धोनीचा सर्वात मोठा विक्रम!

या धर्तीवर झाली संघाची निवड

आफ्रिकेविरोधात भारतीय संघाची 2020 टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टिकोणातून निवड झाली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळं या संघात खेळाडूंची निवड करताना टी-20 वर्ल्ड कपचा निकष समोर ठेवला आहे. त्यामुळं धोनीला संघात जागा दिलेली नाही. भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2020आधी 22 टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळं ची-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे.

3 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दिपक चहर, नवदीप सैनी.

वाचा-विराटनं डावललं, भारतीय फिरकीपटूचा राग निघाला आफ्रिकेच्या फलंदाजांवर!

'क्रिकेटचा देव' पोहोचला त्यांच्या भेटीला आणि कॅरमही खेळला, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Aug 29, 2019 09:21 PM IST

ताज्या बातम्या