केपटाऊन, 14 जानेवारी : भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कायमच मैदानातल्या त्याच्या आक्रमकपणाबाबत टीकेचा धनी होतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्येही (India vs South Africa 3rd Test) विराट मैदानातल्या वागणुकीमुळे वादात सापडला आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी कोहलीने मैदानात केलेलं वर्तन अपरिपक्व असल्याचं वक्तव्य भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केलं आहे. तिसऱ्या दिवशी डीआरएसच्या निर्णयानंतर डीन एल्गारला जीवनदान मिळालं, यानंतर विराटचा तोल ढासळला.
डीन एल्गारला नॉट आऊट दिल्यानंतर कोहली, अश्विन आणि केएल राहुलने स्टम्प माईकच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेचं प्रसारणकर्ता सुपरस्पोर्टवर आपला राग व्यक्त केला. यानंतर गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना कोहली अपरिपक्व असल्याचं सांगितलं.
'भारतीय कर्णधाराचं स्टम्प माईकमध्ये अशाप्रकारे बोलणं वाईट आहे. असं करून तो कधीच युवा खेळाडूंना आदर्श देऊ शकणार नाही. पहिल्या इनिंगमध्ये विकेट कीपर कॅच 50-50 होता, तेव्हा तुम्ही शांत होतात आणि मयंक अग्रवाल अपील करत होता. मला वाटतं राहुल द्रविडने याबाबतीत कोहलीसोबत बोललं पाहिजे,' असं गंभीर म्हणाला.
कोहली काय म्हणाला?
'आपल्या टीमकडेही लक्ष द्या, जेव्हा ते बॉल चमकवत होते. फक्त विरोधी टीमकडे लक्ष ठेवू नका. पूर्णवेळ लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत,' असं विराट म्हणाला. तर जिंकण्यासाठी चांगला मार्ग शोधा सुपरस्पोर्ट, असं अश्विन स्टम्प माईकसमोर जाऊन म्हणाला. संपूर्ण देशच आमच्याविरुद्ध खेळत असल्याचं वक्तव्य केएल राहुलने केलं.
विराट कोहली आणि गौतम गंभीर हे एकेकाळचे टीम इंडियातील सहकारी आहेत, तसंच दोघंही दिल्लीकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india, Virat kohli