मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA ODI: लखनौतली पहिली वन डे होणार की नाही? पाहा Rain Update

Ind vs SA ODI: लखनौतली पहिली वन डे होणार की नाही? पाहा Rain Update

लखनौमध्ये पावसाचा खेळ

लखनौमध्ये पावसाचा खेळ

Ind vs SA ODI: हवामान विभागाच्या अंदाजानुसार लखनौमध्ये पावसाची रिपरिप सुरु असल्याचं दिसून आलं. त्यामुळे सुरुवातीचा जवळपास एक तासाचा खेळ वाया गेला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

लखनौ, 6 ऑक्टोबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातली तीन सामन्यांची वन डे मालिका आजपासून सुरु होत आहे. पण लखनौतल्या पहिल्याच वन डेत पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला. पावसामुळे हा सामना नियोजित वेळेत सुरु होऊ शकला नाही. बीसीसीआयनं दोन तास आधी नियोजित वेळेत बदल करुन अर्धा तास उशीरानं सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. पण दोन वाजल्यानंतरही परिस्थिती न सुधारल्यानं लखनौ वन डेवर अनिश्चिततेचे ढग दाटून आले आहे.

सामन्याचं भवितव्य काय?

हवामान विभागानं आज लखनौमध्ये 96 टक्के पाऊस होणार असा अंदाज वर्तवला होता. आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार लखनौमध्ये पावसाची रिपरिप सुरु असल्याचं दिसून आलं. त्यामुळे सुरुवातीचा जवळपास एक तासाचा खेळ वाया गेला आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर सामना रद्द होण्याचीही शक्यता आहे.

मैदानात काय परिस्थिती?

लखनौच्या एकाना स्टेडियमवर सध्या पावसाचा लपंडाव सुरु आहे. 1.30 वाजता जोरदार पावसाची सर येऊन गेल्यानंतर 2.30 वाजण्याच्या सुमारास पाऊस थांबला होता. त्यानंतर ग्राऊंड्समननी कव्हर्स पण हटवले. पण लगेचच पावसाची रिपरिप सुरु झाली. पण त्याआधी बीसीसीआयनं एक अपडेट दिली आहे. पाऊस थांबल्यास 2.45 वाजता टॉस होईल आणि 3.00 वाजता 45-45 ओव्हर्सचा सामना सुरु होणार असल्याचं म्हटलं होतं.

पण मैदानात अजून कव्हर्स असल्यानं खेळ लवकर सुरु होण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा - Cricket: IPL खेळलेल्या या क्रिकेटरला अटक, बलात्काराचा गंभीर आरोप; पाहा काय आहे प्रकरण?

भारत वि. दक्षिण आफ्रिका वन डे मालिका

पहिला वन डे सामना – 6 ऑक्टोबर, लखनौ

दुसरा वन डे सामना – 9 ऑक्टोबर, रांची

तिसरा वन डे सामना – 11 ऑक्टोबर, दिल्ली

First published:

Tags: Cricket, Cricket news, Shikhar dhawan, Sports