पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारताचा दणदणीत विजय

पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारताचा दणदणीत विजय

पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारतानं 73 धावांनी विजय मिळवत वनडे मालिकेवर 4-1 ने कब्जा मिळवला आहे.

  • Share this:

पोर्ट एलिझाबेथ, 14 फेब्रुवारी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने आज नवा इतिहास रचला. पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारतानं 73 धावांनी विजय मिळवत वनडे मालिकेवर 4-1 ने कब्जा मिळवला आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये द. आफ्रिकेच्या धरतीवर पहिल्यांदाच भारताने आपला तळ ठोकला आहे.

यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव पुन्हा एकदा विजयाचे हिरो ठरले. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिल्यादा फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारतानं २७४ धावा केल्या. रोहित शर्मानं ११५ धावा केल्या. त्यानंतर २७५ धावांच लक्ष्य दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना पेलवलं नाही. हाशिम आमला वगळता, दक्षिण आफ्रिकेचे सर्वं फलंदाज भारतीय फिरकीपुढे पुन्हा एकदा हतबल झाले.कुलदीप यादवनं चार तर चहलनं दोन बळी घेतले.

११५ धावा करणारा रोहित शर्मा मॅन ऑफ द मॅच ठरला. भारताचा दक्षिण आफ्रिकेतला हा पहिलाचं मालिका विजय आहे. ६ सामन्यांच्या मालिकेत भारतानं ४-१ अशी विजयी आघाडी घेतलीय.

सेंट जॉर्ज पार्क मैदानावर नाणेफेक जिंकून ऐडन मार्करम याने भारताला फलंदाजीला निमंत्रित केले होतं. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आक्रमक फटकेबाजी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली.

धवन 23 चेंडूंत 8 चौकारांसह 34 धावा काढून परतला. यानंतर रोहितने कर्णधार विराट कोहलीसह 105 धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. रोहित चांगली फटकेबाजी करीत असल्याचे पाहून कोहलीने त्याला जास्तीत जास्त स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक धाव घेताना झालेल्या गोंधळामुळे कोहली धावबाद झाला. त्याने 54 चेंडूंत 36 धावा केल्या. यानंतर अजिंक्य रहाणेही (8) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला.

First published: February 14, 2018, 7:13 AM IST

ताज्या बातम्या