भरमैदानात चाहतीनं काढली ऋषभ पंतची विकेट, सर्वांसमोर म्हणाली I Love You!

भरमैदानात चाहतीनं काढली ऋषभ पंतची विकेट, सर्वांसमोर म्हणाली I Love You!

फॉर्ममध्ये नसलेल्या ऋषभ पंतला त्याच्या चाहतीनं दिलं स्पेशल गिफ्ट

  • Share this:

बंगळुरू, 23 सप्टेंबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. भारतीय खेळाडूंच्या सुमार फलंदाजीमुळं भारताला हा मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. यात सर्वात जास्त टीका होत आहे ती भारताचा युवा खेळाडू ऋषभ पंतवर. महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंतची संघात निवड झाली, मात्र त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋषभ पंत केवळ 19 धावा करत आऊट झाला. याआधी मोहालीमध्ये झालेल्या दुसऱ्य़ा टी-20 सामन्यात पंतनं केवळ 4 धाव करत बाद झाला. या दोन्ही सामन्यात एक गोष्ट खास होती, ती म्हणजे पंतची बाद होण्याची पध्दत. दोन्ही सामन्यात पंत बेजबाबदार शॉट मारत बाद झाला.

दरम्यान, तिसऱ्या सामन्याआधी सराव करत असताना पंत चाहत्यांना स्वाक्षरी देत होता. यावेळी ऋषभ पंतची चाहती जोरात आय लव्ह यू, अशी ओरडली आणि पंत चक्क लाजला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. यानंतर व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत. दरम्यान पंतला वर्ल्ड कपनंतर एकाही सामन्यात चांगली फलंदाजी करता आलेली नाही.

वाचा-पंतचे दिवस भरले! टीम मॅनेजमेंटनं दिली धमकी पण गंभीरनं घेतली बाजू

पंतला मिळाली निवड समितीकडून धमकी

एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये पंतला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळं निवड समितीचे प्रमुख एम. एस. के प्रसाद यांनी पंतला धमकी दिली आहे. यासाठी पंतच्या जागी इशान, किशन, संजू सॅमसन आणि इतर खेळाडूंचे पर्याय तयार केले आहे. याआधी भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फलंदाजांना सतत संधी दिली जाणार नाही, अशा शब्दात सुनावले होते. त्यामुळं पंतचे दिवस आता भरले आहे, असेच चित्र दिसत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधातही पंतनं त्याच चुका केल्या. त्यामुळं याचा भुरदंड त्याला भरावा लागणार आहे.

वाचा-सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या दिग्गज खेळाडूवर आता नियम तोडल्यामुळं झाली शिक्षा

कसा घेणार पंत धोनीची जागा

पंतने टी-20मध्ये 19 सामन्यात 20.40च्या सरासरीने 306 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 65 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनीने त्याच्या पहिल्या 19 टी-20 सामन्यात 25च्या सरासरीने 310 धावा केल्या. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता. 45 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पण पंत आणि धोनीच्या बाबत एक गोष्ट वेगळी आहे. ती म्हणजे या दोघांचा फलंदाजीला येण्याचा क्रम होय. पंत टॉप ऑर्डरमध्ये खेळण्यास येतो तर धोनी तळाच्या क्रमवारीत फलंदाजीसाठी येत असे. या फरकाशिवाय दोघांच्या टी-20 करिअरची कामगिरी समानच आहे. पंतचे आतापर्यंतचे करिअर आणि धोनीच्या सुरुवातीच्या करिअरची तुलना केल्यास दोघांच्या कामगिरीत फार मोठा फरक नाही. पण धोनीने प्रत्येक वर्षी त्याच्या खेळात सुधारणा केली. धोनीवर कधीच विकेट बेजबाबदारपणे गमवण्याचा आरोप झाला नाही. पंतच्या बाबत हाच मोठा आरोप केला जात आहे. जर धोनी प्रमाणेच पंतने देखील हा डाग बाजूला केल्यास तो महान खेळाडू होऊ शकेल.

वाचा-सर्बियन मॉडेलच्या प्रेमात पडला टीम इंडियाचा स्टार खेळाडू, सोशल मीडियावर कबुली

टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकले का पंत?

पंतवर होणारी टीका विचारात घेता. तसेच रवी शास्त्री आणि विक्रम राठोड यांनी त्याला दिलेला इशारा पाहता आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये संघात जागा मिळवणे पंतसाठी अवघड होत चालले आहे. आक्रमक क्रिकेट आणि बेजबाबदार क्रिकेट यात फरक असतो, अशा शब्दात राठोड यांनी पंतला समज दिली होती. सध्या अशीही चर्चा सुरु आहे की, धोनीने निवृत्ती जाहीर न करण्याचे एक मुख्य कारण त्याला योग्य असा पर्याय मिळालेला नाही.

वाचा-टीम इंडियात चाललंय काय? चौथ्या क्रमांकासाठी पंत-अय्यर यांच्यात गोंधळ

SPECIAL REPORT : आरे कारशेडवरून सेना-भाजप संघर्ष वाढला; आदित्यच्या विरोधाला मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2019 09:09 PM IST

ताज्या बातम्या