India vs South Africa : आफ्रिकेची नवी चाल, टॉससाठी ड्युप्लेसिस उतरणार नाही मैदानात तर...

India vs South Africa : आफ्रिकेची नवी चाल, टॉससाठी ड्युप्लेसिस उतरणार नाही मैदानात तर...

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात तिसरा सामना रांची येथे 19 ऑक्टोबरला होणार आहे.

  • Share this:

रांची, 18 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात तिसरा सामना रांची येथे 19 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यासह भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्विप देण्यास सज्ज आहे. याआधी भारतीय संघानं 2-0नं आधीच मालिका आपल्या खिशात घातली आहे. त्यामुळं तिसरा सामना आफ्रिकेसाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान हा सामना जिंकण्यासाठी आफ्रिकेनं वेगळी शक्कल लढवली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसनं आतापर्यंत आशियाई खंडात एकही टॉस जिंकलेला नाही. फाफनं सलग 9 सामन्यात टॉस गमावला आहे. त्यामुळं ही मालिका तोडण्यासाठी रांचीमध्ये टॉससाठी आफ्रिकेच्या वतीनं वेगळा खेळाडू मैदानात उतरू शकते. आतापर्यंत दोन्ही कसोटी सामन्यात आफ्रिकेला टॉस जिंकता आलेला नाही. दरम्यान ही पहिली वेळ नाही आहे, जेव्हा फाफनं असे काम केले आहे. याआधी 2018मध्येही त्यानं अशी कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी झिम्बाम्वेमध्ये झालेल्या सामन्यात त्यानं जेपी ड्युमिनीला टॉस जिंकण्यासाठी पाठवले आहे. त्यावेळी ड्युमिनीनं टॉस जिंकला होता.

याआधी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातील कर्णधार मेग लेनिंगनं अशी रणनीती वापरली होती. या सामन्यात टॉस जिंकण्यासाठी एलिसा हीलीला पाठवण्यात आले होते.

मालिकेत भारताकडे 2-0ची आघाडी

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात 203 धावांनी विजय मिळवला. तर, पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला. पुण्यातील कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतानं मालिका 2-0नं जिंकली. भारताचा हा घरच्या मैदानावरचा 11वा विजय होता. यासह भारतानं ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. याआधी ऑस्ट्रेलियानं 10 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. याशिवाय टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ 200 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2019 05:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading