India vs South Africa : कोण मारणार बाजी? आफ्रिकाविरोधात नाही तर टीम इंडियात विक्रमांसाठी स्पर्धा!

India vs South Africa : कोण मारणार बाजी? आफ्रिकाविरोधात नाही तर टीम इंडियात विक्रमांसाठी स्पर्धा!

आजच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन यांना आपल्या नावावर रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

  • Share this:

मोहाली, 18 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा कसोटी सामना मोहाली येथे होणार आहे. दरम्यान ही कसोटी मालिका भारतासाठी टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधात भारतानं युवा खेळाडूंना संघात जागा दिली आहे, त्यामुळं कोणत्या खेळाडूंना विराट संधी देणार हे ही पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दुसरीकडे या मालिकेत भारतीय खेळाडूंकडे आपल्या नावावर काही विक्रम करण्याची संधीही मिळणार आहे. यात कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.

भारताचा उप-कर्णधार रोहित शर्मा टी-20मध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. रोहितनं 96 सामन्यात 2422 धावा केल्या आहेत. तर, दुसरीकडे विराट हा रोहितपेक्षा धावांच्या बाबतीत थोडा मागे आहे. कोहलीच्या नावावर 70 सामन्यात 2369 धावा आहेत. दोघांमध्ये सध्या केवळ 53 धावांचा फरक आहे, त्यामुळं कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.

याशिवाय विराट कोहलीनं टी-20मध्ये 231 चौकार लगावले आहेत. तर रोहितच्या नावावर 215 चौकार आहेत.या दोघांशिवाय शिखर धवन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. धवननं टी-20मध्ये 6959 धावा आहेत. त्यामुळं 7 हजार धावा करण्यासाठी धवनला फक्त 44 धावांची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज

2422- रोहित शर्मा

2369- विराट कोहली

2283- मार्टिन गुप्तिल

2263-शोएब मलिक

वाचा-आज तुटणार सर्वात मोठा रेकॉर्ड, 4 वर्षांनंतर भारताला सूड घेण्याची संधी!

रोहितला गुप्टिलचा रेकॉर्ड तोडण्याची संधी

या मालिकेत रोहित शर्मानं 84 धावा केल्यास तो न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलला मागे टाकू शकतो. गुप्टिलनं दक्षिण आफ्रिकाविरोधात सर्वात जास्त धावा केल्या आहे. गुप्टिलच्या नावावर 424 धावा आहेत. तर रोहित शर्मानं दक्षिण आफ्रिकाविरोधात 341 धावा केल्या आहेत.

शिखरसाठी लकी आहे मोहालीचे मैदान!

महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत शिखर धवनसाठी मोहालीचे मैदान खास राहिले आहे. शिखरनं आपल्या कसोटी करिअरची सुरुवात मोहालीच्या मैदानातूनच केली होती. पदापर्णातच त्यानं 187 धावा केल्या होत्या. हा सामना 2013मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरोधात खेळला गेला होता.

वाचा-आफ्रिकाविरोधात 4 वर्षांपूर्वीचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज, येथे पाहा LIVE

या फलंदाजांच्या नावावर आहे 7 हजारहून अधिक धावा करण्याचा विक्रम

दक्षिण आफ्रिका विरोधात होणाऱ्या सामन्यात शिखरकडे आपल्या नावावर टी-20मध्ये 7 हजार धावा करण्याची संधी आहे. या यादीत विराट कोहली, सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांचे नाव याआधी सामिल झाले आहे. विराटनं 269 सामन्यात 8475 धावा केल्या आहेत. तर, सुरेश रैनाने 319 सामन्यात 8392 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या नावावर 316 सामन्यात 8291 धावांची नोंद आहे.

वाचा-सामना आफ्रिकाविरुद्ध तयारी वर्ल्ड कपची! 'या' 11 खेळाडूंना कोहली देणार संघ जागा

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: September 18, 2019, 6:10 PM IST

ताज्या बातम्या