India vs South Africa : आऊट झाला की नाही? अश्विनच्या मिस्ट्री बॉलनं सगळेच चक्रावले, VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

India vs South Africa : आऊट झाला की नाही? अश्विनच्या मिस्ट्री बॉलनं सगळेच चक्रावले, VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात भारताला 326 धावांची विक्रमी आघाडी मिळाली आहे.

  • Share this:

पुणे, 12 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात भारताला 326 धावांची विक्रमी आघाडी मिळाली आहे. यात आर. अश्विनच्या 4 विकेटमुळं आफ्रिकेचा संघ 275 धावांवर गारद झाला. त्यामुळं कसोटी सामन्यात 10 महिन्यांनी टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या अश्विननं या मालिकेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली.

पहिल्या डावात विराट आणि मयंकनं तुफानी फलंदाजी केल्यानंतर आफ्रिकेचे फलंदाज अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. तरी, गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशव महाराजनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केशवच्या 72 धावांच्या खेळीमुळं आफ्रिकेनं 275 धावांपर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवसाच्या अंती भारतानं चांगली गोलंदाजी करत 275 धावांवर बाद केले.

दरम्यान या डावात अश्विनची एक अजब गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू पाहून फलंदाज आऊट झाला की नाही, असा प्रश्न फलंदाजापासून पंचांपर्यंत सगळ्यांना पडला. अश्विनच्या चेंडूवर फलंदाजीसाठी आलेला क्विंटन डी कॉक बोल्ड झाला. डिकॉक आणि ड्यु प्लेसिस यांच्या 75 धावांची भागिदारी अश्विनच्या या मिस्ट्री चेंडूनं मोडली.

वाचा-ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा प्रताप, तब्बल 4 हजार 738 दिवसांनी केली अजब कामगिरी

डिकॉक बोल्ड झाल्यानंतर त्याला कळलेच नाही की तो आऊट झाला की नाही. डिकॉक बाद झाल्यानंतरही काही काळ मैदानावरच थांबला होता. एवढेच नाही तर भारतीय संघातील काही खेळाडूंनाही हा प्रश्न पडला. मात्र पंचांनी डिकॉकला बाद घोषित केल्यानंतर त्यानं मैदान सोडले.

वाचा-टीम इंडियाची सुरक्षा वाऱ्यावर! चाहत्यानं भरमैदानात रोहितच्या अंगावर मारली उडी

अश्विननं पूर्ण केल्या 50 विकेट

या मालिकेत अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट पूर्ण केल्या. सर्वात जलद 50 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आता चौथ्या क्रमांकावर आहे. अश्विनच्याआधी तीन भारतीय गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. कसोटीमध्ये अनिल कुंबळेनं दक्षिण आफ्रिकाविरोधात सर्वात जास्त विकेट घेतल्या आहेत. कुंबळेनं 21 कसोटी सामन्यात 84 विकेट घेतल्या आहेत. तर, जवागल श्रीनाथनं 13 सामन्यात 64 विकेट घेतल्या आहे. हरभजन सिंगनं 11 कसोटी सामन्यात 60 विकेट घेतल्या आहे. अश्विननं सर्वात जलद फक्त 9 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे.

वाचा-आधी टीम इंडियानं नाकारलं; आता लगावले विराट, रोहितपेक्षा जलद द्विशतक

कुस्ती 'अशां'सोबत होत नाही, हातवारे करून पवारांनी फडणवीसांना फटकारले, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: r ashwin
First Published: Oct 12, 2019 07:54 PM IST

ताज्या बातम्या