India vs South Africa : दुसऱ्या दिवशी भारताचीच दहशत, आफ्रिकेचा संघ अडचणीत

India vs South Africa : दुसऱ्या दिवशी भारताचीच दहशत, आफ्रिकेचा संघ अडचणीत

विराटच्या 254 आणि मयंकच्या शतकी खेळीच्य जोरावर भारतानं आफ्रिकेसमोर उभारला धावांचा डोंगर.

  • Share this:

पुणे, 11 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या दिवशी आफ्रिकेनं तीन विकेट गमावत 36 धावा केल्या. भारतानं 601 धावांवर डाव घोषित केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्या ओव्हरमध्येच उमेश यादवनं मोठा झटका दिला. भारतानं दिलेल्या आव्हानाच पाठलाग करताना उमेश यादवनं 4 ओव्हरमध्ये सलामीवीरांना मागे धाडले.

भारतानं धावांचा डोंगर उभारल्यानंतर उमेश यादवनं भारताला मोठे यश मिळवून दिले. उमेशनं दुसऱ्याच ओव्हरमध्ये भारताला पहिले यश मिळवून दिले. मक्रम शुन्यावर तर एल्गार 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर शमीनं टेंम्बाला 8 धावांर माघारी धाडले. दक्षिण आफ्रिकेला कमबॅक करण्यासाठी फलंदाजांनी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.

दरम्यान, पहिल्या दिवशी भारतानं 273 धावा केल्या. तर, दुसऱ्या दिवशी विराट आणि रहाणे यांच्या शतकी भागिदारीनं भारताचा डाव पुढे सरकरला. विराटनं 10 महिन्यांनंतर शतकी कामगिरी केली तर, रहाणे 58 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराटनं जडेजासोबत विक्रमी अशी 225 धावांची भागिदारी केली. जडेजा 91 धावांवर बाद झाला, त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही.

सचिन आणि सेहवागला कोहलीनं टाकले मागे

भारताकडून सर्वात जास्त दुहेरी शतक लगावणारा विराट हा पहिला फलंदाज आहे. याआधी सचिन आणि सेहवागनं कसोटी क्रिकेटमध्ये सहावेळी द्विशतकाची कामगिरी केली होती. तर, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉंटिंग, श्रीलंकेचा मर्वन अटापट्टू, पाकचा जावेद मियांदाद आणि युनिस खान यांनी 6 वेळा ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये सर्व दुहेरी शतक कर्णधार असताना लगावले आहे. तर, 7 पैकी 6 दुहेरी शतक विराटनं भारतात केले आहे. तर, आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये दुहेरी शतक लगावणारा विराट पहिला कर्णधार ठरला आहे.

विराटनं डॉन ब्रॉडमनला टाकले मागे

विराट कोहलीनं तब्बल 9व्यांदा 150 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहे. या विक्रमासह विराटनं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या लिस्टमध्ये सात वेळा 150 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. यात ऑस्ट्रेलियाच मायकल क्लार्क, श्रीलंकेचा महेला जयवर्धने आणि वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा या दिग्गजांचा समावेश आहे.

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

First Published: Oct 11, 2019 03:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading