India vs South Africa : भारतानं दिला दक्षिण आफ्रिका संघाला आधार, जर्सीवर असणार 'या' इंडियन कंपनीचे नाव

India vs South Africa : भारतानं दिला दक्षिण आफ्रिका संघाला आधार, जर्सीवर असणार 'या' इंडियन कंपनीचे नाव

भारतीय संघाच्या जर्सीवर बायजू या भारतीय कंपनीचे नाव आल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीवरही भारतीय कंपनी जळकणार आहे.

  • Share this:

मोहाली, 16 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाला. धर्मशाला मैदानावर होणारा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. त्यामुळं आता सर्वांचे लक्ष मोहालीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यावर आहे. 18 सप्टेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याआधी एका भारतीय कंपनीनं दक्षिण आफ्रिकेला आधार दिला आहे. याआधी भारतीय संघाच्या जर्सीवर बायजू या भारतीय कंपनीचे नाव आल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीवरही भारतीय कंपनी जळकणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ एक वेगळ्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरतील. खास गोष्ट म्हणजे या संघाचे मुख्य प्रयोजक एक भारतीय कंपनी असणार आहे. ही कंपनी आहे अमुल. याआधी अमुलनं वर्ल्ड कप 2019मध्ये अफगाणिस्तानच्या संघाला स्पॉन्सर केले होते. त्यामुळं भारत वगळता अमूलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन संघांना मदत केली आहे.

वाचा-कमाल केली राव! 867 ओव्हरनंतर ‘या’ गोलंदाजानं टाकला पहिला नो-बॉल

भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे अमूल

अमुल (Amul)नं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी एक करार केला आहे. या करारानुसार दक्षिण आफ्रिका संघाच्या जर्सीवर आता अमुल कंपनीचा लोगो दिसणार आहे. अमुल दुग्धजन्य उत्पादकांमध्ये भारतातील सर्वात मोठी तर जगातली नवव्या स्थानावर आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल 7 बिलियन डॉलर आहे. अमुल भारताची सर्वात मोठी दुग्धजन्य कंपनी असून त्यांचा लोगो दक्षिण आफ्रिका संघाच्या जर्सीवर आहे.

वाचा-फायनलपेक्षा वरचढ ठरला भारत-पाक सामना, भारतीय चाहत्यांनी मोडला मोठा विक्रम

चाहत्यांशी हितसंबंध जोपासण्यास मदत होईल

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं अमुलसोबत भागीदारी केल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. अमुलनं आंतरराष्ट्रीय स्थरावर आपला चाहता वर्ग वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कुगांड्री गोवेंडरनं अमुलचे आभारही मानले. तर, अमुलचे प्रमुख डॉ. आर. एस. सोढी यांनी दक्षिण आफ्रिका संघाचे विशेष आभार मानले आहेत. अमुलच्याआधी दक्षिण आफ्रिका संघाचे प्रायोजक स्पांसर न्यू बॅलेंस नावाची कंपनी होती. मात्र, आयसीसी वर्ल्ड कप 2019मध्ये दक्षिण आफ्रिका संघाला चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळं न्यू बॅलेंसनं प्रायोजकपद सोडले. त्यामुळं भारताविरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी अमुलसोबत करार केला आहे.

वाचा-धोनीशिवाय चेन्नई सुपरकिंग्ज मैदानात उतरणार? श्रीनिवासन यांच्या वक्तव्यानं चर्चा

शाई झाली आता मुख्यमंत्र्यांवर जिवंत कोंबड्या फेकल्या, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 09:12 PM IST

ताज्या बातम्या