S M L

भारताची 'विराट' विजयी हॅटट्रिक, दक्षिण आफ्रिकेवर 124 धावांनी विजय

विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवलाय.

Sachin Salve | Updated On: Feb 8, 2018 12:44 AM IST

भारताची 'विराट' विजयी हॅटट्रिक, दक्षिण आफ्रिकेवर 124 धावांनी विजय

07 फेब्रुवारी :  विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवलाय. भारताने दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 124 धावांनी पराभव केलाय. या विजयासह भारताने 3-0 ने आघाडी घेतलीये.

 

भारत आणि साऊथ आफ्रिकेदरम्यान केपटाऊऩच्या न्यूलँडस स्टेडियमवर तिसरा एकदिवशीय सामन्यात  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या शानदार शतकी खेळीवर भारताने 303 धावांचा डोंगर उभारला होता. 303 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेनं टीमची खराब सुरुवात झाली.  भारतीय गोलंदाजाच्या पुढे आफ्रिकेनं टीमने नांगी टाकली.  आफ्रिकनं टीमकडून सर्वाधिक 51 धावा जेपी डुमिनीने केल्यात. भारताकडून यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवने प्रत्येक 4-4 विकेट घेऊन आफ्रिकनं टीमला सुरुंग लावला. अवघी टीम 40 व्या ओव्हरमध्ये 179 धावांवर गारद झाली.भारताची इनिंग

पहिली बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा बाद झाला. सुरुवातील एकापाठोपाठ 3 गडी बाद झाले. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने टीम इंडियाची कमान सांभाळली. पण शिखर धवन 76 धावा करून बाद झाला. धवन आऊट झाल्यानंतर अंजिक्य रहाणेही 11 धावा करून माघारी परतला.

विराट कोहलीने कॅप्टन इनिंग पेश करत नाबाद 160 धावांची खेळी केली. यात त्याने 14 चौकार आणि 2 षटकार लगावले. भारताने निर्धारीत 50 ओव्हरमध्ये 303 धावांचा डोंगर उभारला होता.  भारताने हा सामना जिंत 3-0 ने आघाडी घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2018 11:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close