Elec-widget

'विराट' सेनेची कमाल, सहावी वनडे जिंकत मालिका खिश्यात

'विराट' सेनेची कमाल, सहावी वनडे जिंकत मालिका खिश्यात

  • Share this:

16 फेब्रुवारी : कॅप्टन विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या मायभूमीत धुळदाण उडवलीये. भारताने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवलाय.

या विजयासह भारताने मालिका खिश्यात घातलीये.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकर शार्दुल ठाकूरच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघाने लोटांगण घेतलं. शार्दुलने सामन्यात ४ बळी घेत कर्णधार विराट कोहलीचा विश्वास सार्थ ठरवला. शार्दुलनंतर जसप्रित बुमऱ्हा आणि यजेंद्र चहलने प्रत्येकी 2 गडी बाद केले. 47 व्या षटकार दक्षिण आफ्रिकेला 205 धावांमध्ये गुंडाळलं.

भारताची सुरुवात मात्र खराब राहिली. चौथ्या षटकार रोहीत शर्मा 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवनने विराट कोहलीला साथ दिली. पण 13 षटकार शिखर धवन 18 धावांवर बाद झाला. पण दुसरीकडे कॅप्टन विराट कोहलीने दमदार इनिंग पेश केली. विराट कोहलीने आपल्या नेहमीच्या लयीत मैदानात चौफेर फटकेबाजी करत आपल्या ३५ व्या शतकाला गवसणी घातली.

96 बाॅलमध्ये 19 चौकार, 2 षटकार लगावत विराटने 129 धावा कुटल्यात. विराटला सामनावीर आणि मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. भारताने सहा एकदिवशीय मालिका 5-1 ने जिंकत मालिका जिंकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 11:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...