भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 275 धावांचं टार्गेट

भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 275 धावांचं टार्गेट

भारताने सहा एकदिवशीय सामन्यात 3 ने आघाडी घेतली होती. मात्र, चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं कमबॅक केलंय.

  • Share this:

13 फेब्रुवारी : भारताचा हिटमॅन रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने सहाव्या एकदिवशीय सामन्या दक्षिण आफ्रिकेसमोर 275 धावांचं लक्ष्य ठेवलंय. रोहित शर्माने खणखणीत 115 धावांची खेळी केलीये.

आज पहिली फलंदाजी करताना भारताने निर्धारीत 50 षटकार सात गडी बाद होत 274 धावा केल्यात. रोहित शर्माने 126 चेंडुचा सामना करत 11 चौकार आणि 4 षटकार लगावत 115 धावा करून शतक झळकावले. रोहितनंतर शिखर धवनने 34 , कॅप्टन विराट कोहलीने 36 आणि श्रेयस अय्यरने 30 धावा केल्यात. तर दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 4 गडी बाद केले.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान पाचवा एकदिवशीय सामना पोर्ट एलिझाबेथ इथं सुरू आहे. भारताने सहा एकदिवशीय सामन्यात 3 ने आघाडी घेतली होती. मात्र, चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं कमबॅक केलंय. त्यामुळे मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय नोंद केलाय.

First published: February 13, 2018, 8:49 PM IST

ताज्या बातम्या