India vs South Africa : हा तर कॅच नव्हताच! पाहा आफ्रिकेविरुद्ध साहाचा अफलातून VIDEO

India vs South Africa : हा तर कॅच नव्हताच! पाहा आफ्रिकेविरुद्ध साहाचा अफलातून VIDEO

हा व्हिडीओ पाहून, तुम्हाला विश्वास बसणार नाही की साहानं खरचं हा कॅच झेलला.

  • Share this:

रांची, 22 ऑक्टोबर : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना एक डाव आणि 202 धावांनी जिंकला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फंलदाजांची दाणादाण उडाली. तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेचे 8 ग़डी बाद झाले होते. त्यानंतर चौथ्या दिवशी भारताने फक्त 12 चेंडूत उरलेले दोन गडी बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारतानं याआधीचे दोन्ही कसोटी सामने जिंकले होते. तिसरा सामना जिंकून आफ्रिकेला व्हाइटवॉश दिला.

दरम्यान, पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेने खराब कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांनी चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान, सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या 9 मिनिटात खेळ संपला. खेळपट्टीवर टिकाव धरलेला डे ब्रून 30 धावांवर बाद झाला. शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. महत्त्वाचे म्हणजे चेंडूला अपेक्षित उसळी न मिळाल्यामुळे चेंडू जमिनीच्या अगदी जवळ होता. त्याचवेळी साहाने तो कॅच पकडला. या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाला लागली फक्त 9 मिनीटं आणि 12 चेंडू!

वाचा-यंदा कर्तव्य आहे! स्टार क्रिकेटपटू अडकणार सर्बियन मॉडेलच्या बंधनात

तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात 497 धावा केल्यानंतर आफ्रिकेला फॉलोऑन दिला. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेची अवस्था तिसऱ्या दिवसअखेर 8 बाद 132 अशी झाली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी शमीने 10 धावात 3 तर उमेश यादवने 2 गडी बाद केले. त्यांची अवस्था 5 बाद 36 अशी झाली होती. त्यानंतर जॉर्ज लिंडे (27 धावा), डेन पीट (23 धावा) यांनी डाव सावरला. त्यानंतर थिनिस डी ब्रुइन नाबाद 30 धावा केल्या. त्याच्यासोबत एनरिच नॉर्तझे 5 धावांवर खेळत होते.

वाचा-पगारवाढीसाठी कर्णधारासह संपूर्ण संघ संपावर, टी-20 वर्ल्ड कप धोक्यात

चौथ्या दिवशी भारताने त्यांचा डाव 133 धावांवर संपुष्टात आणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 04:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading