Elec-widget

India vs South Africa : चाहत्यांसाठी खुशखबर! निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार धोनी

India vs South Africa : चाहत्यांसाठी खुशखबर! निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार धोनी

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांची येथे होणार आहे.

  • Share this:

रांची, 12 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका विरोधात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यात पहिल्या सामन्यात विजय मिळवत, दुसरा सामनाही टीम इंडियात खिशात घालण्याच्या तयारीत आहे. दरम्यान तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना रांचीमध्ये होणार आहे. रांची म्हटलं की क्रिकेट चाहत्यांना आठवतो तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. त्यामुळं या सामन्यात धोनी सहभागी होणार असे अपेक्षा वर्तवली जात आहे.

धोनीनं 2014मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या धोनी फक्त एकदिवसीय आणि टी-20 संघाचा हिस्सा आहे. त्यातही धोनी गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट खेळत नाही आहे. त्यामुळं धोनी आता एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार का? असा सवाल चाहत्यांना पडला आहे. वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं धोनी थेट टी-20 वर्ल्ड कप खेळणार असल्याच्या चर्चा आहेत.

वाचा-जडेजाला अर्धशतकानंतर जल्लोष करण्यापासून थांबवलं, विराटनेही घेतली फिरकी

दरम्यान, निवृत्तीनंतरही धोनी कसोटी सामन्यात दिसू शकतो. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना 19 ऑक्टोबरला रांची येथे होणार आहे. यासाठी भारतीय संघ 15 ऑक्टोबरला रांचीला पोहचेल. दरम्यान, या सामन्याच्या आयोजकांनी चाहत्यांना सराव पाहण्याची संधी दिली आहे. त्यामुळं टीम इंडियाच्या सराव सत्रात धोनीही उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याबाबत आयोजकांना विचारले असता त्यांनी याबाबत मत व्यक्त करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र धोनी सराव करताना दिसला नाही तरी, सामना पाहण्यासाठी नक्कीच उपस्थित राहू शकतो. सध्या टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0नं भारत आघाडीवर आहे.

Loading...

वाचा-आफ्रिकेच्या खेळाडूंचा मैदानावरचं राडा! एकमेकांना शिव्या घातल्याचा VIDEO VIRAL

दरम्यान, पुण्यातील सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 601 धावांवर डाव घोषित केला. यात विराटनं शानदार खेळी करत तब्बल 1 वर्षांनंतर द्विशतक केले. त्याआधी मयंक अग्रवालनं शतकी कामगिरी केली होती. दरम्यान भारतानं डाव घोषित केल्यानंतर आफ्रिकेला चांगली फलंदाजी करता आली नाही. आफ्रिकेचा संघ दबावात दिसला. उमेश यादवनं दुसऱ्याच दिवशी सलामीवीरांचा मागे धाडले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी शमी, अश्विननं मिळून 5 विकेट घेतल्या. त्य़ामुळं आफ्रिकेचा संघ सध्या अडचणीत दिसत आहे तर भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे.

वाचा-कसोटीत विराट सुसाट! घरच्या मैदानावर कर्णधाराचा 'महापराक्रम'

पंतप्रधान मोदींनी 30 मिनिटं केली समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: dhoni
First Published: Oct 12, 2019 01:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...