India vs South Africa : भाग भाग, आया शेर आया शेर! विराटचा व्हायरल फोटो झाला ट्रोल

विराटच्या व्हायरल फोटोवर चाहत्यांनी बनवले भन्नाट मिम्स.

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 10:41 AM IST

India vs South Africa : भाग भाग, आया शेर आया शेर! विराटचा व्हायरल फोटो झाला ट्रोल

रांची, 23 ऑक्टोबर : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना एक डाव आणि 202 धावांनी जिंकला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फंलदाजांची दाणादाण उडाली. तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेचे 8 ग़डी बाद झाले होते. त्यानंतर चौथ्या दिवशी भारताने फक्त 12 चेंडूत उरलेले दोन गडी बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारतानं याआधीचे दोन्ही कसोटी सामने जिंकले होते. तिसरा सामना जिंकून आफ्रिकेला व्हाइट वॉश दिला.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं या ऐतिहासिक विजयासह अनेक किर्तीमान आपल्या नावावर केले आहे. याशियाव विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार झाला आहे. मात्र याच सामन्यात विराटनं चाहत्यांचे अनोखे मनोरंजन केले.

दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विराटचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला. प्रत्येक सामन्यात आपला एक अनोखा मस्तीवाला विराट पाहायला मिळतो. वेगवेगळ्या पध्दतीनं सामना जिंकल्यानंतर किंवा विकेटनंतर जल्लोष करणे ही विराटची खासियत आहे. या कसोटी सामन्यात तर विराट वेगवेगळे चेहरे बनवताना दिसला. दरम्यान आयसीसीनं ट्विट केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट मिम्स बनवले आहेत.

विराट चालू सामन्यात आपल्या अंदाजानं खेळाडूंचे मनोंरजन करत असतो. कधी त्याच्या डान्स स्टाईलची तर कधी त्यांचे मजेदार फोटो व्हायरल होत असतात. असेच विराटनं मीम सध्या व्हायरल होत आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ

कर्णधार विराट कोहली पहिला कर्णधार ठरला आहे, ज्यानं दक्षिण आफ्रिका संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. याआधी कोणत्याच कर्णधाराला असा पराक्रम करता आला नाही आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका विरोधात एकपेक्षा जास्त मालिका जिंकण्याची कामगिरी करणारा विराट पहिला कर्णधार ठरला आहे. याधी सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरनं 1-1 मालिका जिंकल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2019 10:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...