India vs South Africa : धोनीच्या होमग्राऊंडवर विराट करणार कमाल, मोडणार माहीचा सर्वात मोठा विक्रम

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात धोनीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 07:16 AM IST

India vs South Africa : धोनीच्या होमग्राऊंडवर विराट करणार कमाल, मोडणार माहीचा सर्वात मोठा विक्रम

रांची, 18 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियानं निर्विवादपणे आपले वर्चस्व राखले. आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका याआधीच 2-0नं आपल्या खिशात घातल्यानंतर तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. हा सामना 19 ऑक्टोबरला रांची येथे होणार आहे. याआधी भारतानं विशाखापट्टणम आणि पुण्यात विजयी कामगिरी केली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं जबरदस्त कामगिरी केली आहे. याचबरोबर विराट कोहलीनं पुण्यात झालेल्या कसोटी सामन्यात द्विशतकी कामगिरी करत सर्व दिग्गजांना मागे टाकले. आता रांचीमध्ये विराटचे लक्ष्य असणार आहे ते, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा सर्वात मोठा रेकॉर्ड तोडण्याचे. धोनीनं कसोटी क्रिकेटमध्ये भारताला सर्वोच्च स्थान पोहचवले होते. त्याचबरोबर धोनी कसोटीमध्ये सर्वात जास्त धावा करणारा कर्णधार झाला होता. ही कामगिरी धोनीनं 2013मध्ये चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरोधात केली होती.

वाचा-तिसऱ्या कसोटी सामन्याआधी आफ्रिकेला मोठा झटका, प्रमुख खेळाडू संघाबाहेर

या कसोटी सामन्यात एका दिवसात धोनीनं 206 धावा केल्या होत्या. यात आता दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. कोहलीनं कर्णधार म्हणून कसोटी मालिकेत एका दिवसात 191 धावा केल्या आहे. चेन्नईमध्ये धोनीनं 224 धावांची खेळी केली होती. हे धोनीच्या करिअरमधले एकमात्र कसोटी द्विशतक होते.

धोनीनं 90 कसोटी सामन्यात 38.09च्या सरासरीनं 4 हजार 876 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर सहा शतक आहेत. तर, कसोटी सामन्यात त्यानं 256 झेल, 38 स्टम्पिंग केल्या आहेत. धोनीनं कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात 60 सामन्यांपैकी 27 सामन्यात विजय मिळवला होता.

Loading...

वाचा-‘हा प्रश्न मोदी आणि इमरान यांना विचारा’, गांगुलीच्या वक्तव्यानं खळबळ

मालिकेत भारताकडे 2-0ची आघाडी

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात 203 धावांनी विजय मिळवला. तर, पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला. पुण्यातील कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतानं मालिका 2-0नं जिंकली. भारताचा हा घरच्या मैदानावरचा 11वा विजय होता. यासह भारतानं ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. याआधी ऑस्ट्रेलियानं 10 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. याशिवाय टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ 200 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

वाचा-क्रिकेटमध्ये झाला मोठा भ्रष्टाचार, ICCने कर्णधारासह तीन खेळाडूंना केले निलंबित

VIDEO : 'देवेंद्र फडणवीस ठरवणार उपमुख्यमंत्री', पाहा काय म्हणाले अमित शाह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2019 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...