India vs South Africa : हरभजननं हेरला आफ्रिकेचा डाव, भारताला हरवण्यासाठी ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूला उतरवणार मैदानात?

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियानं निर्विवादपणे आपले वर्चस्व राखले आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 12:31 PM IST

India vs South Africa : हरभजननं हेरला आफ्रिकेचा डाव, भारताला हरवण्यासाठी ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूला उतरवणार मैदानात?

रांची, 17 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियानं निर्विवादपणे आपले वर्चस्व राखले आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका याआधीच 2-0नं आपल्या खिशात घातल्यानंतर तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. आफ्रिकेचा संघ आपली लाज राखण्यासाठी तिसऱ्या सामना जिंकण्याचा प्रयत्न करू शकतो.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना 19 ऑक्टोबरला रांची येथे होणार आहे. आतापर्यंत आफ्रिका संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं अखेरच्या सामन्यात आफ्रिका संघ मोठे बदल करू शकतो. दरम्यान भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज यानं ट्विटरवर आफ्रिकेचा नवा डाव हेरला आहे. भारताला हरवण्यासाठी सध्या माजी दिग्गज खेळाडू तयारी करत आहे.

हरभजननं दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉंटी रॉड्स याला रांचीत कसोटी सामना खेळणार का, असा प्रश्न विचारला. जॉंटीनं सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला होता. यात जॉंटी दक्षिण आफ्रिकेची जर्सी घालून उभा होता, यावर “हिरवी जर्सी पुन्हा घालून छान वाटत आहे. पण ते जाहीरातीसाठी का असेना”, असे कॅप्शन लिहिले होते. या फोटोवर हरभजनन सिंगने जॉंटीची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही. हरभजननं या फोटोवर, “तु रांची कसोटी सामना खेळणार आहेस का? दक्षिण आफ्रिकेला चांगल्या फलंदाजीची गरज आहे. यावर जॉंटीनं पुन्हा, “दक्षिण आफ्रिकेला माझ्यापेक्षाही जास्तची गरज आहे”, असे लिहित हरभजननला उत्तर दिले.

मालिकेत भारताकडे 2-0ची आघाडी

Loading...

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात 203 धावांनी विजय मिळवला. तर, पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला. पुण्यातील कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतानं मालिका 2-0नं जिंकली. भारताचा हा घरच्या मैदानावरचा 11वा विजय होता. यासह भारतानं ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. याआधी ऑस्ट्रेलियानं 10 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. याशिवाय टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ 200 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

भाजपचं ठरलंय! 'हे' असणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2019 12:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...