India vs South Africa : आता लक्ष्य क्लिन स्विप! अखेरच्या सामन्यात ‘हा’ युवा खेळाडू करणार कमबॅक

या सामन्यात विराट कोणत्या अकरा खेळाडूंना संधी देणार हे पाहावे लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 06:29 PM IST

India vs South Africa : आता लक्ष्य क्लिन स्विप! अखेरच्या सामन्यात ‘हा’ युवा खेळाडू करणार कमबॅक

रांची, 18 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिकेतील अखेरचा सामना 19 ऑक्टोबरला रांची येथे होणार आहे. दरम्यान या सामन्यात विराट कोणत्या अकरा खेळाडूंना संधी देणार हे पाहावे लागणार आहे. विराट या सामन्यात काही महत्त्वाचे बदल करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान भारतानं तीन सामन्यांची मालिका याआधी 2-0नं आपल्या खिशात घातली आहे.

तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जलग गोलंदाज उमेश यादवच्या जागी कुलदीप यादवला संघात जागा दिली जाऊ शकते. भारतानं दोन सामने जिंकत मालिका आपल्या खिशात घातली आहे. त्यामुळं रांचीमध्ये विजय मिळवत आफ्रिकेला क्लिन स्विप देण्याचा लक्ष्य भारतीय संघासमोर असणार आहे. याआधी पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघानं पीचनुसार खेळाडूंची निवड केली आहे.

वाचा-आफ्रिकेची नवी चाल, टॉससाठी ड्युप्लेसिस उतरणार नाही मैदानात तर...

फलंदाजीमध्ये होणार नाहीत बदल

यात फलंदाजीमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल ही जोडी फॉर्ममध्ये असल्यामुळं कायम राहिल. तर, मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे ही तिगडी असेल. तर, विकेटकिंपींगची जबाबदारी ऋध्दीमान साहाकडेच असेल.

फिरकी गोलंदाजीमध्ये दिसू शकते तिकडी

पुण्यात झालेल्या कसोटी सामन्यात हनुमा विहारीच्या जागी कोहलीनं उमेश यादवला संघात स्थान दिले होते. मात्र रांचीमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला संघात जागा दिली जाऊ शकते. दरम्यान आज बराच काळ कुलदीपनं मैदानावर घाम गाळत सराव केला. त्यामुळं रांचीमध्ये आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव अशी तिकडी दिसू शकते.

वाचा-अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO

भारतः रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, ऋद्धिमान साहा, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

दक्षिण अफ्रीकाः डीन एल्गर, टेम्बा बवुमा, थियोनिस डि ब्रुएन, फाफ डुप्लेसिस, हेनरिक क्लासेन, एमरिच नोर्ट्जे, क्विंटन डिकॉक, मुथुस्वामी, वर्नन फिलैंडर, डेन पीट, कगिसो रबाडा.

वाचा-धोनीच्या होमग्राऊंडवर विराट करणार कमाल, मोडणार माहीचा सर्वात मोठा विक्रम

'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2019 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...