India vs South Africa : तिसऱ्या कसोटी सामन्याआधी आफ्रिकेला मोठा झटका, प्रमुख खेळाडू संघाबाहेर

India vs South Africa : तिसऱ्या कसोटी सामन्याआधी आफ्रिकेला मोठा झटका, प्रमुख खेळाडू संघाबाहेर

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना 19 ऑक्टोबरला रांची येथे होणार आहे.

  • Share this:

रांची, 17 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियानं निर्विवादपणे आपले वर्चस्व राखले. आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका याआधीच 2-0नं आपल्या खिशात घातल्यानंतर तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. मात्र, या सामन्याआधीच आफ्रिकेला मोठा झटका बसला आहे. एक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळं तिसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना 19 ऑक्टोबरला रांची येथे होणार आहे. आतापर्यंत आफ्रिका संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र या सामन्याआधीच आफ्रिकेचा फलंदाज अॅडन मार्क्रम (Aiden Markram) दुखापतीमुळं बाहेर पडला आहे. याआधीही आफ्रिका संघाला एक झटका बसला होता.दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांनी याबाबत खुलासा केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात मार्क्रमच्या उजव्या हाताला जखम झाली होती. ही दुखापत गंभीर असल्यामुळं तो तिसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही आहे.

हे खेळाडू याआधी गेलेत संघाबाहेर

आफ्रिकेचा फलंदाज अॅडन मार्क्रम आधी अष्टपैलू खेळाडू केशव महाराजही संघाबाहेर गेला होता. त्यामुळं हे दोन खेळाडू भारताविरोधात तिसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही आहेत. अॅडन मार्कमनं भारताविरोधात दोन कसोटी सामन्यात 44 धावा केल्या होत्या.

दोन डावांत शुन्यावर बाद झाला मार्कम

मार्क्रम पुण्यात झालेल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शुन्यावर बाद झाला होता. 25 वर्षीय फलंदाजानं 19 कसोटी सामने खेळले आहेत. बांगलादेश विरोधात 2017मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मार्क्रमनं कसोटीमध्ये 4 शतक आणि 6 अर्धशतक लगावले आहेत.

मालिकेत भारताकडे 2-0ची आघाडी

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात 203 धावांनी विजय मिळवला. तर, पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला. पुण्यातील कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतानं मालिका 2-0नं जिंकली. भारताचा हा घरच्या मैदानावरचा 11वा विजय होता. यासह भारतानं ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. याआधी ऑस्ट्रेलियानं 10 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. याशिवाय टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ 200 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

भाजपचं ठरलंय! 'हे' असणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री

Published by: Priyanka Gawde
First published: October 17, 2019, 2:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading