INDvsSA : पदार्पणात धमाल करणाऱ्या खेळाडूला टीम इंडियात अखेरची संधी? कशी असेल प्लेईंग इलेव्हन

INDvsSA : पदार्पणात धमाल करणाऱ्या खेळाडूला टीम इंडियात अखेरची संधी? कशी असेल प्लेईंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 ने आघाडी घेतली आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 22 सप्टेंबर : भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा टी20 सामना रविवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अखेरच्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरेल तर आफ्रिका बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असेल. दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं विजय मिळवला.

अखेरच्या टी20 सामन्यात भारत सलामीच्या फलंदाजीची धुरा धवन आणि रोहित शर्मा यांच्याकडे असेल. धवन आणि रोहित शर्मा यांना अद्याप म्हणावा तसा सूर गवसलेला नाही. या सामन्यात त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. त्यानंतर मधल्या फळीत कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर खेळतील. सध्या विराट कोहली फॉर्ममध्ये आहे.

टीम इंडिया तीन अष्टपैलू खेळाडूंसह या सामन्यात उतरू शकते. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कृणाल पांड्या यांना संधी मिळू शकते. कृणाल पांड्याला दुसऱ्या टी20 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली होती. यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतकडे असेल. त्याचे फलंदाजीतील अपयश सध्या भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. पदार्पणात जबरदस्त कामगिरी करून लक्ष वेधून घेणाऱ्या पंतला निवड समितीनं इशारा दिला आहे. पंतसाठी पर्यायी खेळाडू संघात तयार केले जात असल्याचंही निवड समितीने म्हटलं होतं. त्यामुळं पंतसाठी हा सामना करो किंवा मरो असाच असणार आहे.

गोलंदाजीत दीपक चाहर आणि नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दीपक चाहरनं दुसऱ्या टी20 सामन्यात दोन गडी बाद केले होते.

अमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका, पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 22, 2019, 9:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading