मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA T20: एक दोन नव्हे तर रोहितनं टीममध्ये केले इतके बदल, पाहा इंदूरमध्ये टीम इंडियात कुणाला संधी

Ind vs SA T20: एक दोन नव्हे तर रोहितनं टीममध्ये केले इतके बदल, पाहा इंदूरमध्ये टीम इंडियात कुणाला संधी

भारत वि. दक्षिण आफ्रिका टी20

भारत वि. दक्षिण आफ्रिका टी20

Ind vs SA T20: इंदूर टी20 साठी रोहित शर्मानं भारतीय संघात तीन बदल केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

इंदूर, 4 ऑक्टोबर: गुवाहाटीतल्या विजयानंतर आज भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर इंदूरमध्ये दोन हात करणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगचं आमंत्रण दिलं आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात एकूण तीन बदल करण्यात आले आहेत. तर रोहित शर्मा चार वेगवान बॉलर्ससह खेळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे बर्थडे बॉय रिषभ पंत आजच्या सामन्यात उपकर्णधार असणार आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन- रोहित शर्मा (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (व्हाईस कॅप्टन), श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमेश यादव

विराट-लोकेशला विश्रांती

इंदूर टी20 साठी भारतानं संघानं तीन बदल केले आहेत. त्यात विराट कोहली आणि लोकेश राहुलला विश्रांती देण्यात आली आहे. आशिया कपपासून जुना विराट कोहली पुन्हा पाहायला मिळत आहे. विराट पुन्हा फॉर्मात परतल्यानं भारतीय गोटात समाधानाचं वातावरण आहे. त्यामुळे वर्ल्डकपआधी त्याला इंदूरमध्ये विश्रांती दिली जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी टी20त विराटनं नाबाद 49 धावांची खेळी केली होती. याच सामन्यात त्यानं टी20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पाही ओलांडला.

विराटच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय संघात जागा मिळाली आहे. तर रोहितनं राहुलच्या जागी एक अतिरिक्त गोलंदाज खेळवला आहे. भारतीय संघात सिराज आणि उमेश यादवचं कमबॅक झालं आहे. तर अर्शदीपला विश्रांती दिली आहे.

क्लीन स्वीपचा निर्धार

गेल्याच आठवड्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला टी20 मालिकेत 2-0 अशी मात दिली होती. पण आता दक्षिण आफ्रिकेला 3-0 असा क्लीन स्वीप देण्याची संधी भारतासमोर आहे. इंदूरमध्ये सामन्यासह मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतरेल.

First published:

Tags: Cricket