India vs South Africa : रोहित शर्मा 9 धावांवर झाला बाद, तरी केली धोनीची बरोबरी!

India vs South Africa : रोहित शर्मा 9 धावांवर झाला बाद, तरी केली धोनीची बरोबरी!

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा केवळ 9 धावा करत बाद झाला.

  • Share this:

बंगळुरू, 22 सप्टेंबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारतानं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सलीमीला आलेल्या रोहित शर्माला चांगली फलंदाजी करता आली नाही. या सामन्यात रोहित फक्त 9 धावा करत बाद झाला. दुसऱ्याच ओव्हरमध्ये हेंड्रिक्सनं रोहितला बाद केले. मात्र या सामन्यात रोहित शर्मानं केवळ 9 धावा करत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बरोबरी केली आहे.

भारतीय संघासाठी 2006मध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 98 सामने खेळले आहेत. तर, रोहित शर्मानं दक्षिण आफ्रिका विरोधात तिसऱ्या टी-20 सामन्यात या रेकॉर्डची बरोबरी केली. रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय टी-20 करिअरमधला हा 98वा सामना होता. रोहित शर्मानं टी-20 क्रिकेटमध्ये 98 सामन्यात 4 शतक आणि 17 अर्धशतक केले आहेत. यात रोहितनं 2434 धावा केल्या आहेत. सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकण्यासाठी रोहितला 7 धावांची गरज आहे. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमध्ये शतक लगावणारा रोहित एकमेव फलंदाज आहे.

वाचा-धोनीच्या निर्णयामुळं चाहत्यांना बसला शॉक, म्हणाला...

रोहित शर्मानं 2007मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघात पदापर्ण केले होते. दरम्यान पदार्पणाच्या सामन्यात रोहितला फलंदाजी करता आली नाही. मात्र, दुसऱ्या सामन्यात रोहितनं विक्रमी शतकी खेळी केली. या सामन्यात रोहितला सामनावीराचा पुरस्कारही देण्याता आला होता. हा सामना टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका विरोधात खेळला गेला होता.

वाचा-अर्जुन पुरस्कार विजेत्याच्या कारला अपघात, तिघांचा दुर्देवी मृत्यू

भारतासाठी सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले खेळाडू

98 सामने- एम.एस. धोनी आणि रोहित शर्मा

78 सामने-सुरेश रैना

72 सामने - विराट कोहली

58 सामने - युवराज सिंग

55 सामने - शिखर धवन

वाचा-फलंदाजाचा जीवघेणा शॉट; थोडक्यात वाचला गोलंदाज, पाहा खतरनाक VIDEO

'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 08:08 PM IST

ताज्या बातम्या