Elec-widget

India vs South Africa : आता तरी पंत सुधारणार का? दिग्गज खेळाडूकडून मिळाले गुरूमंत्र

India vs South Africa : आता तरी पंत सुधारणार का? दिग्गज खेळाडूकडून मिळाले गुरूमंत्र

ऋषभ पंतच्या बेजबाबदार खेळीमुळं टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याला संघात स्थान मिळणार का, हे पाहावे लागणार आहे.

  • Share this:

बंगळुरू, 21 सप्टेंबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या टी-20 मालिकेत भारतानं विजयी सुरुवात केली आहे. दरम्यान भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी-20 सामना 22 सप्टेंबरला बंगळुरू येथे होणार आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात अपेक्षेप्रमाणे युवा गोलंदाजांनी आणि कर्णधार विराट कोहलीनं चांगली खेळी केली. दरम्यान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनं शुक्रवारी चिन्नास्वामी मैदानावर भारतीय संघासोबत वेळ घालवला. मोहालीमध्ये दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवल्यानंतर गुरुवारी भारतीय संघ बंगळुरूमध्ये पोहचला.

दक्षिण आफ्रिकाविरोधात तिसऱ्या टी-20 सामन्यात काही खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्गदर्शन केले. बीसीसीआयनं रवी शास्त्री आणि द्रविड या दोन दिग्गजांचा फोटो टाकला होता. यावेळी द्रविडनं भारतीय संघातील खेळाडूंची भेट घेत सल्ले दिले. यात आघाडीवर होता भारताचा स्टार युवा खेळाडू ऋषभ पंत. पंतनं आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 5 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. त्यामुळेच सोशल मीडियावर पंत ट्रोल झाला आहे. त्यामुळे पंतच्या कामगिरीमुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आल्याची चर्चा आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पंत बेजबाबदारपणे बाद झाला. पंतच्या कामगिरीवर याआधी देखील कर्णधार विराट कोहली(Virat Kohli), प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri) आणि फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड(Vikram Rathour) यांनी सार्वजनिक वक्तव्य केले होते.

वाचा-धवनला झोपेत बडबडण्याची सवय? रोहितने शेअर केला VIDEO

द्रविडनं घेतली पंतची भेट

भारतीय संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविडनं संघातील अनेक खेळाडूंची भेट घेतली. यावेळी पंतसोबत काही काळ घालवत त्याला फलंदाजीच्या टिप्सही दिल्या. त्यामुळं तिसऱ्या टी-20 सामन्यात पंतच्या खेळीवर सर्वांचे लक्ष असणआर आहे.

Loading...

टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकले का पंत?

पंतवर होणारी टीका विचारात घेता. तसेच रवी शास्त्री आणि विक्रम राठोड यांनी त्याला दिलेला इशारा पाहता आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये संघात जागा मिळवणे पंतसाठी अवघड होत चालले आहे. आक्रमक क्रिकेट आणि बेजबाबदार क्रिकेट यात फरक असतो, अशा शब्दात राठोड यांनी पंतला समज दिली होती. सध्या अशीही चर्चा सुरु आहे की, धोनीने निवृत्ती जाहीर न करण्याचे एक मुख्य कारण त्याला योग्य असा पर्याय मिळालेला नाही.

वाचा-निवड समितीनं शोधला पंतला पर्याय, तीन खेळाडूंची नावे आघाडीवर!

कसा घेणार पंत धोनीची जागा

पंतने टी-20मध्ये 19 सामन्यात 20.40च्या सरासरीने 306 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 65 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनीने त्याच्या पहिल्या 19 टी-20 सामन्यात 25च्या सरासरीने 310 धावा केल्या. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता. 45 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पण पंत आणि धोनीच्या बाबत एक गोष्ट वेगळी आहे. ती म्हणजे या दोघांचा फलंदाजीला येण्याचा क्रम होय. पंत टॉप ऑर्डरमध्ये खेळण्यास येतो तर धोनी तळाच्या क्रमवारीत फलंदाजीसाठी येत असे. या फरकाशिवाय दोघांच्या टी-20 करिअरची कामगिरी समानच आहे. पंतचे आतापर्यंतचे करिअर आणि धोनीच्या सुरुवातीच्या करिअरची तुलना केल्यास दोघांच्या कामगिरीत फार मोठा फरक नाही. पण धोनीने प्रत्येक वर्षी त्याच्या खेळात सुधारणा केली. धोनीवर कधीच विकेट बेजबाबदारपणे गमवण्याचा आरोप झाला नाही. पंतच्या बाबत हाच मोठा आरोप केला जात आहे. जर धोनी प्रमाणेच पंतने देखील हा डाग बाजूला केल्यास तो महान खेळाडू होऊ शकेल.

वाचा-पाकमध्ये क्रिकेटला येणार अच्छे दिन? श्रीलंकेनंतर 'हा' संघही जाणार दौऱ्यावर

पुण्यात सिलिंडरचा स्फोट; स्फोटाची भीषणता दाखवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...