India vs South Africa : टीम इंडियाचा सुमार खेळ! आफ्रिकेनं 9 विकेटनं सामना जिंकत मालिकेत केली बरोबरी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेली तीन टी-20 सामन्यांची मालिका बरोबरीत सुटली.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 10:13 PM IST

India vs South Africa : टीम इंडियाचा सुमार खेळ! आफ्रिकेनं 9 विकेटनं सामना जिंकत मालिकेत केली बरोबरी

बंगळुरू, 22 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेली तीन टी-20 सामन्यांची मालिका बरोबरीत सुटली. तिसऱ्या कसोटी सामन्यातभारताच्या फलंदाजांनी सुस्त फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 135 धावांचे आव्हान दिले. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेने आक्रमक फलंदाजी करत 9 विकेटनं सामना जिंकला. कर्णधार क्विंटन डी कॉकच्या 79 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं सोपा विजय मिळवला.

सलामीसाठी आलेल्या रिझा हेन्ड्रिक्स आणि कर्णधार क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागिदारी केली. त्यानंतर भारताला हार्दिक पांड्यानं एकमेव विजय मिळवून दिला. हेंड्रिक्स 28 धावा करत बाद झाला. त्यानंतर टेम्बा बवुमा यानं सामना फिनिश केला. या सामन्या भारतीय गोलंदाजांनाही चांगली गोलंदाजी करता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 4 ओव्हरमध्ये 6.75च्या सरासरीनं सर्वात जास्त म्हणजे 27 धावा दिल्या. तर, नवदीप सैनीनं केवळ 2 ओव्हरमध्ये 25 धावा दिल्या.

Loading...

दरम्यान, धर्मशाला येथील पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द झाला. तर, दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 7 विकेटनं विजय मिळवला. मात्र, तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला सातत्य राखता आले नाही. तिसऱ्या सामन्यात भारतानं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. भारतासाठी शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी खेळाची सुरुवात केली. मात्र रोहित शर्मा जास्त काळ मैदानावर टिकू शकला नाही. रोहित शर्मा दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावांवर बाद झाला.

दरम्यान लगेचच आठव्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी करताना शिखर धवन मोठा शॉट मारण्याच्या नादाद बाद झाला. शम्सीच्या चेंडूवर तेम्बा बावूमा सीमारेषेजवळ उत्कृष्ठ कॅच घेत शिखरला बाद केले. शिखर धवन 36 धावा करत बाद झाला. धवननं आपल्या खेळीत 4 चौकार आणि दोन षटकार लगावले. दरम्यान पुढच्याच ओव्हरमध्ये कोहली 9 धावा करत बाद झाला. त्यानंतर भारताचा पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान संघाला गरज असतानाच ऋषभ पंत पुन्हा एकदा बेजबाबदार खेळी करत बाद झाला. पंत 19 धावा करत बाद झाला. वर्ल्ड कपपासून आतापर्यंत पंतनं चांगली खेळी केलेली नाही. त्यामुळं पंतची जागा आता धोक्यात आली आहे. दरम्यान पुढच्याच ओव्हरमध्ये श्रेयस अय्यरही बाद झाला. कृणाल पांड्यालाही विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडानं तीन, हेंड्रिग्ज आणि फॉरट्युन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.

वाचा-धोनीच्या निर्णयामुळं चाहत्यांना बसला शॉक, म्हणाला...

ऋषभ पंतनं गमावली शेवटची संधी

भारताचा स्टार खेळाडू म्हणून संघात असलेला पंत सध्या खराब कामगिरी करत आहे. वर्ल्ड कपपासून, दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत पंतला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. आफ्रिकेविरोधात दुसऱ्या सामन्यात पंत 4 धावांवर बेजबाबदार शॉट मारत बाद झाला होता. दरम्यान आजच्या सामन्यातही असाच प्रकार घडला. मोक्याच्या क्षणी पंत 19 धावा करत बाद झाला. त्यामुळं पंतला टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघात जागा मिळण्याची संधी कमी आहे.

वाचा-फलंदाजाचा जीवघेणा शॉट; थोडक्यात वाचला गोलंदाज, पाहा खतरनाक VIDEO

रोहित शर्मानं केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

रोहित शर्मानं दक्षिण आफ्रिका विरोधात तिसऱ्या टी-20 सामन्यात या रेकॉर्डची बरोबरी केली. रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय टी-20 करिअरमधला हा 98वा सामना होता. रोहित शर्मानं टी-20 क्रिकेटमध्ये 98 सामन्यात 4 शतक आणि 17 अर्धशतक केले आहेत. यात रोहितनं 2434 धावा केल्या आहेत. सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकण्यासाठी रोहितला 7 धावांची गरज आहे. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमध्ये शतक लगावणारा रोहित एकमेव फलंदाज आहे.

असा आहे भारताचा संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर आणि नवदीप सैनी.

वाचा-अर्जुन पुरस्कार विजेत्याच्या कारला अपघात, तिघांचा दुर्देवी मृत्यू

'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 06:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...