India vs South Africa : असं झालं तरी काय? विराटला प्रतिस्पर्धी संघाची नाही तर आपल्याच खेळाडूंची वाटली भिती

India vs South Africa : असं झालं तरी काय? विराटला प्रतिस्पर्धी संघाची नाही तर आपल्याच खेळाडूंची वाटली भिती

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात भारतानं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.

  • Share this:

पुणे, 10 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पुणे येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टॉसआधी विराटनं आपल्यावर दबाव असल्याचे सांगत सर्वांना बुचकळ्यात पाडले. कॅप्टन कोहलीला टीम मॅन या नावानं ओळखले जाते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वात जास्त कसोटी सामने जिंकले आहेत. आज आपला 50वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराटनं मात्र सामन्याआधीच आपल्यावर खेळाडूंनी दबाव टाकल्याचे सांगितले.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतानं खिशात टाकला. दरम्यान दुसरा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत आहे. या सामन्यात भारतानं संघात एक बदल केला आहे. हनुमा विहारीला बाहेर बसवत उमेश यादवला संघात स्थान दिले आहे.

वाचा-India vs South Africa : दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

विराटवर खेळाडूंनी टाकला दबाव

कोहली कर्णधार म्हणून 50वा सामना खेळत आहे. मात्र टॉसच्या आधी खेळाडूंनी दबाव टाकल्याचे विराटनं स्पष्ट केले. कोहलीनं टॉस जिंकल्यानंतर, “संघातील खेळाडू टॉस जिंकण्यासाठी माझ्यावर दबाव टाकत आहेत. कारण आम्हाला पहिली फलंदाजी आवडते”, असे सांगितले. पहिल्या कसोटी सामन्यातही भारतानं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान आजच्या सामन्यात सलामीला उतरलेला रोहित शर्मा लवकर बाद झाला. रोहित शर्मानं केवळ 14 धावा केल्या.

वाचा-‘रोहितबाबत मला काही विचारू नका’, पत्रकार परिषेदत एका प्रश्नावरून भडकला विराट

दक्षिण आफ्रिकेचा संघ- डीन अल्गर, अॅडेन मार्करम, थ्युनिस डिब्रून, फाफ डुप्लेसिस, तेंबा बावुमा, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), केशव महाराज, सेनुरन मुथ्थुसामी, वर्नोन फिलेंडर, अॅनरिक नॉर्तेजे आणि कॅगिसो रबाडा.

भारताचा संघ- मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, आर अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.

वाचा-टेस्ट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अव्वल, तरी ICCवर बरसला कॅप्टन कोहली

VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

Published by: Priyanka Gawde
First published: October 10, 2019, 11:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading