पुणे, 11 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिका विरोधातल्या कसोटी सामन्यात द्विशकत केले. विराटनं 295 चेंडूत 28 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं ही कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमधली विराटची ही सातवी डबल सेंच्युरी आहे. विराटनं 1 वर्ष 10 महिन्यांनंतर दुहेरी शतक लगावले आहे. यासह विराटनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता चौथ्या क्रमांकावर आहे. विराटनं या दुहेरी शतकासह महेला जयवर्धने आणि वॉली हेमंड यांची बरोबरी केली आहे. दुहेरी शतक पूर्ण करताच विराटनं कसोटी क्रिकेटमध्ये 7 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. कमी सामन्यात 7 हजार धावा पूर्ण करणारा विराटचा चौथा फलंदाज आहे.
भारताकडून सर्वात जास्त दुहेरी शतक लगावणारा विराट हा पहिला फलंदाज आहे. याआधी सचिन आणि सेहवागनं कसोटी क्रिकेटमध्ये सहावेळी द्विशतकाची कामगिरी केली होती. तर, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉंटिंग, श्रीलंकेचा मर्वन अटापट्टू, पाकचा जावेद मियांदाद आणि युनिस खान यांनी 6 वेळा ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये सर्व दुहेरी शतक कर्णधार असताना लगावले आहे. तर, 7 पैकी 6 दुहेरी शतक विराटनं भारतात केले आहे. तर, आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये दुहेरी शतक लगावणारा विराट पहिला कर्णधार ठरला आहे.
गेल्या तीन वर्षात लगावले सर्व दुहेरी शतक
विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या डावात 21 शतक लगावले आहे. यात 9 शतकांमध्ये एकही दुहेरी शतक नाही आहे. तर, पुढच्या 7 शतकांमध्ये 6 दुहेरी शतक आहे. त्यामुळं गेल्या तीन वर्षात विराटनं एकामागोमाग एक असे सात दुहेरी शतक लगावले आहेत.
विराटनं डॉन ब्रॉडमनला टाकले मागे
विराट कोहलीनं तब्बल 9व्यांदा 150 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहे. या विक्रमासह विराटनं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या लिस्टमध्ये सात वेळा 150 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. यात ऑस्ट्रेलियाच मायकल क्लार्क, श्रीलंकेचा महेला जयवर्धने आणि वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा या दिग्गजांचा समावेश आहे.
सगळ्यात जास्त धावा असलेला कर्णधार
द्विशतकासह विराटनं स्वत:च्या सर्वोत्तम धावसंख्येला मागे टाकले आहे. याआधी विराटनं 2017-18मध्ये श्रीलंकेविरोधात 243 धावा केल्या होत्या. विराटनं या धावसंख्येला मागे टाकले आहे. त्याचबरोबर विराट सर्वात जास्त धावा करणारा कर्णधार ठरला आहे. 2012-13मध्ये धोनीनं ऑस्ट्रेलियाविरोधात 224 धावा केल्या होत्या. तर, सचिननं 1999-00मध्ये न्यूझीलंड विरोधात 217 धावा केल्या होत्या.
VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग