India vs South Africa : कोहलीचा 'विराट' विक्रम! सचिन तेंडुलकर आणि धोनीलाही टाकले मागे

India vs South Africa : कोहलीचा 'विराट' विक्रम! सचिन तेंडुलकर आणि धोनीलाही टाकले मागे

पहिल्या दिवसात केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विराटनं आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे.

  • Share this:

पुणे, 10 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं पहिल्या दिवशी 273 पर्यंत मजल मारली. यात मयंक अग्रवालनं शतकी खेळी केली तर विराटनं 63 धावा केल्या. पहिल्या दिवसात केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विराटनं आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा विराट फलंदाज ठरला आहे. विराटनं सचिन आणि धोनीलाही मागे टाकत एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आज अनोखं अर्धशतक केले. विराट कोहलीनं कर्णधार म्हणून 50वा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात विराटनं नाबाद 63 धावा केल्या. दरम्यान कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिका विरोधात विराटनं सर्वात जास्त 600 धावा केल्या आहेत. विराटनं तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनंनं कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये 553 धावा केल्या होत्या. तर, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. धोनीनं कसोटीमध्ये कर्णधार म्हणून 461 धावा केल्या आहेत.

वाचा-कॅप्टन कोहलीला थेट पाकिस्तानमधून आलं निमंत्रण! PHOTO VIRAL

तत्पूर्वी, भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताला 10व्या ओव्हरमध्येच पहिला झटका बसला. रोहित शर्मा फक्त 14 धावा करत बाद झाला. त्यानंतर पुजारा आणि मयंकनं शतकी भागिदारी केली. मात्र पुजारा अर्धशतकी खेळी करत बाद झाला. मयंकनं या सामन्यातही आक्रमक आणि संयमी खेळीचे योग्य प्रदर्शन केले. शतकी खेळी केल्यानंतर मयंक लगेचच 108 धावांवर बाद झाला.

वाचा-मयंक अग्रवालचं शानदार शतक, मोडला सेहवागचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम

दक्षिण आफ्रिका विरोधात सर्वात जास्त धावा करणार कर्णधार

विराट कोहली- 600* धावा

सचिनतेंडुलकर- 553 धावा

महेंद्रसिंग धोनी- 461 धावा

10 महिन्यांपासून विराटला शतकी खेळीची अपेक्षा

कसोटी क्रिकेटमध्ये 81 सामने खेळणाऱ्या विराटनं 25 शतक लगावले आहे. मात्र विराटनं शेवटचे शतक 2018मध्ये लगावले होते. त्यानंतर त्यानं 10 कसोटी सामने खेळले आहेत, मात्र यात त्याला शतकी खेळी करता आलेली नाही. गेल्या दहा महिन्यात 5 कसोटी सामन्यात विराटची सर्वोत्तम खेळी 82 धावा राहिली आहे. दरम्यान आपला 50वा सामना खेळत असलेल्या विराट 63 धावांवर खेळत आहे.

वाचा-विराटला प्रतिस्पर्धी संघाची नाही तर आपल्याच खेळाडूंची वाटली भिती

VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

Published by: Priyanka Gawde
First published: October 10, 2019, 5:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading