पुणे, 09 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं विजयी आघाडी मिळवली. या सामन्यात रोहित शर्माची खेळी विशेष लक्षणीय ठरली. दोन्ही डावांमध्ये रोहितनं शतकी कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार आपल्या मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे रोहितनं एकूण 28 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 27 सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. दक्षिण आफ्रिका विरोधात पहिल्यांदाच रोहित सलामीला उतरला आणि त्यानं 303 धावा केला.
विशाखापट्टणममध्ये रोहित पहिल्यांदा सलामीसाठी फलंदाजीला उतरला. त्यामुळं आता दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सामन्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मात्र विराटचा वेगळा सुर पाहायला मिळाला. विराटला रोहितबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यानं नाराजी व्यक्त केली.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना पुणे येथे 10 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत रोहितबाबत प्रश्न विचारला असता रोहितनं नाराजी व्यक्त केली. रोहित दुसऱ्या सामन्यात कशा प्रकारची खेळी करेल, असे विचारले असता विराटनं, “काही काळासाठी रोहितला एकटं सोडा. तुम्हाला माहित आहे, तो चांगला खेळत आहे. त्याला आपल्या फलंदाजीचा आनंद घेऊ द्या. तो कसा खेळणार आहे, याकडे लक्ष देणं बंद करा”, असे सांगितले.
वाचा-टेस्ट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अव्वल, तरी ICCवर बरसला कॅप्टन कोहली
"Time to let Rohit Sharma enjoy his batting in red ball cricket" - @imVkohli #TeamIndia #INDvSA pic.twitter.com/px6Nhl1sy0
— BCCI (@BCCI) October 9, 2019
विराटनं यावेळी रोहित शर्मा विशाखापट्टणम येथे झालेल्या कसोटी सामन्यात चांगला खेळला असे म्हणत त्याचे कौतुकही केले. कारण सलामीचा फलंदाज म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या रोहित शर्मानं 303 धावा केल्या. यात रोहितनं पहिल्या डावात 176 धावांची तर दुसऱ्या डावात 127 धावांची तुफानी खेळी केली. यासह टी-20चा बादशाह कसोटीमध्येही आपलं रंग दाखवू शकला आहे. रोहित शर्मानं आपल्या दोन डावांमध्ये 13 षटकार लगावले आहेत. कसोटी सामन्यात एवढे षटकार लगावणारा रोहित पहिला फलंदाज आहे.
वाचा-IND vs SA : टीम इंडियाला पुण्यात इतिहास घडवण्याची संधी, करणार विश्वविक्रम?
रोहित शर्मा ठरला षटकारांचा बादशाह
रोहित शर्मा एका कसोटी सामन्यात 9 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठोकला आहे. रोहितनं या सामन्यात एकूण 13 षटकार लगावले. रोहितने पहिल्या डावात शतकी खेळी करताना 6 षटकार ठोकले होते. दुसऱ्या डावात 7 षटकार खेचले आहेत. यासह रोहितने सिद्धू यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला. सिद्धू यांनी 1994मध्ये लखनौ कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 8 षटकार ठोकले होते. तसेच, याआधी पाकिस्तानच्या वसीम अक्रमनं एका कसोटी सामन्यात 12 षटकार ठोकले होते. याचसोबत कसोटी, टी-20 आणि वन-डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे.
वाचा-IND vs SA : पुण्यातील कसोटी सामन्यावर संकट; दोन्ही संघांना बसू शकतो मोठा फटका!
VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं