Elec-widget

India vs South Africa : विराटचा डबल धमाका! द्विशतकासह अनोखा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

India vs South Africa : विराटचा डबल धमाका! द्विशतकासह अनोखा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

याआधी विराटनं 150 धावा करत डॉन ब्रॅडमनचा 71 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला होता.

  • Share this:

पुणे, 11 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात विराटनं द्विशतकाची कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सातव्यांदा दुहेरी शतकी खेळी करण्याची कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्या सात द्विशतक करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तर, महेला जयवर्धनेची बरोबरी विराटनं केली आहे. विराटनं 299 चेंडूत ही कामगिरी केली आहे. यात 28 चौकार तर एका षटकारसह ही कामगिरी आहे. याआधी विराटनं 150 धावा करत डॉन ब्रॅडमनचा 71 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला होता.

दिग्गजांची केली बरोबरी

विराटनं आपल्या शतकाच्या बळावर कमी डावात 26 कसोटी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला. या यादीत ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन (69) अव्वल, स्टीव्ह स्मिथ (121) आणि सचिन तेंडुलकर (136) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दिग्गजांना टाकले मागे

Loading...

10 महिन्यांनंतर शतकी कामगिरी केलेल्या विराटनं अनेक दिग्गजांना मागे टाकण्याची कामगिरी केली आहे. विराट फक्त डॉन ब्रॅडमन यांच्या मागे आहे. त्याचबरोबर स्टिव्ह स्मिथ, माजी विंडीज फलंदाज गॅरी सोबर्स यांच्याशीही बरोबरी साधली. या दोघांच्या नावावरही कसोटी क्रिकेटमध्ये 26 शतकांची नोंद आहे. तसेच, या खेळीदरम्यान विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार 900 धावांचा टप्पा ओलांडत माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांना मागे टाकले.

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2019 02:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...