India vs South Africa : ‘मी देवाचे आणि साहाचे आभार मानतो’, मालिका विजयानंतर भारताचा जलद गोलंदाज झाला भावूक

'त्या कॅचसाठी साहाला एक पार्टी फिक्स'! पाहा कॅचचे भन्नाट व्हिडीओ.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 01:43 PM IST

India vs South Africa : ‘मी देवाचे आणि साहाचे आभार मानतो’, मालिका विजयानंतर भारताचा जलद गोलंदाज झाला भावूक

पुणे, 14 ऑक्टोबर : भारतानं पुण्यातील कसोटी सामन्यात आफ्रिकेविरोधात मोठा विजय मिळवला. भारतानं हा सामना एक डाव आणि 37 धावांनी जिंकला, याबरोबर तीन सामन्यांची मालिकाही आपल्या खिशात घातली. भारताकडून फलंदाजीमध्ये मयंक अग्रवाल, कर्णधार विराट कोली आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र या सामन्यात आपल्या फलंदाजीनं नाही तर आपल्या विकेटकिपींगनं सर्वांचे लक्ष वेधले ते ऋध्दीमान साहानं. बऱ्याच काळानंतर संघात स्थान मिळालेल्या साहानं शानदार कामगिरी करत सर्वांना हैराण केले.

दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना सहाव्या षटकात उमेश यादव गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर थ्युनिश डी ब्रायन लेग साइडला चेंडू फ्लिक करण्याच्या तयारीत होता. मात्र, चेंडू बॅटची कड घेऊन मागे गेला. तेव्हा साहाने सूर मारून चेंडू एका हाताने झेलला. त्याच्या या चपळाईचं कौतुक सोशल मीडियावरही होत होतं.

वाचा-मालिका विजयानंतरही विराटनं आफ्रिकेला दिलं ओपन चॅलेंज, म्हणाला...

पुणे कसोटी सामन्यात साहानं घेतल्या पाच कॅच

साहानं पुण्यातील कसोटी सामन्यात पाच झेल घेतल्या, आणि या सर्व झेल कठिण होत्या. साहानं चपळाई दाखवत कॅच घेतल्या. उमेश यादवनं दुसऱ्या डावात महत्त्वाच्या तीन विकेट घेतल्या. दरम्यान, सामन्यानंतर साहाला कोणत्या प्रकारचे जेवण आवडते असे विचारल्यावर त्यानं गुजराती जेवण असे सांगितले. त्यानंतर उमेश यादवनं, “मी देवाचा आणि साहाचे आभार मानतो, त्यांच्यामुळं आपण हा सामना जिंकलो. त्यामुळं त्याच्या कॅचसाठी मी नक्कीच ट्रीट देईन”, असे सांगितले.

वाचा-कॅप्टन कोहलीचा स्पेशल रेकॉर्ड, 50वा कसोटी सामना ठरला खास

सोशल मीडियावर साहाची चलती

पहिल्या झेलनंतर पुन्हा अश्विनच्या गोलंदाजीवर ड्युप्लेसीचा सोपा झेल घेताना मात्र साहाला कसरत करावी लागली. यात हातात आलेला चेंडू सुटल्यानंतर त्याला दोन तीन वेळा तो झेलण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अखेर त्यातही त्यानं संयम राखत झेल टिपला. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी विंडीज दौऱ्यावर साहाच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. त्यात पंतला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तसेच खराब फटकेबाजीमुळे त्याच्यावर सातत्यानं टीका होत आहे.

वाचा-कसोटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ‘बिग बॉस’, इतर संघांची अवस्था दयनीय!

VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2019 01:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...