Home /News /sport /

IND VS SA: वॉन्डरर्सचा 'लॉर्ड' ठरलेल्या शार्दुलने आपल्या यशाचे उलगडले रहस्य

IND VS SA: वॉन्डरर्सचा 'लॉर्ड' ठरलेल्या शार्दुलने आपल्या यशाचे उलगडले रहस्य

shardul thakur

shardul thakur

फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) मंगळवारी टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स मैदानात 7 विकेट घेणारा तो भारताचा पहिलाच बॉलर ठरला आहे.

    जोहान्सबर्ग, 5 जानेवारी : फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) मंगळवारी टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स मैदानात 7 विकेट घेणारा तो भारताचा पहिलाच बॉलर ठरला आहे. क्रिकेट जगतात त्याच्या कामगिरीचे कौतुक होत. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच बळी मिळवणाऱ्या शार्दुलने आपल्या यशाचे रहस्य जोहान्सबर्गमध्ये चाहत्यांसोबत शेअर केले. त्याचवेळी, त्याने असेही सांगितले की, सर्वोत्तम कामगिरी अजून करायची आहे. दिवसाअखेरचा खेळ संपल्यानंतर शार्दुलने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला खेळपट्टीवर एक तडा दिसून आला. जिथून बॉल वर-खाली होत होता. त्याच ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि वेगाने बॉल टाकण्यात यश आले. IND vs SA : पुजारा-रहाणेसाठी निर्णयाक दिवस, चुकले तर माफी नाही! सेंच्युरियनप्रमाणेच जोहान्सबर्गमध्ये वेगवान गोलंदाजांना मोठा पाठिंबा आहे आणि येथे चांगली लाईन-लेंथ गोलंदाजी करणे महत्त्वाचे आहे. मॅचची सध्याची स्थिती परिस्थिती थोडी गुंतागुंतीची आहे. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला मोठे लक्ष्य दिले तर चांगले होईल. कारण सामन्याला अजून दोन दिवस बाकी आहेत आणि ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अजिबात सोपी नाही. संघाच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी धावसंख्या करायची आहे. SA vs IND: जखमी विराटही मॅचमध्ये सहभागी, बॉलरला दिल्या खास टिप्स VIDEO 7 विकेट घेण्यासंदर्भात बोलताना शार्दुल म्हणाला, माझ्या कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. पण मला वाटते की अजून सर्वोत्तम कामगिरी होणे बाकी आहे. असे मत त्याने यावेळी व्यक्त केले. शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) मंगळवारी टेस्ट करियरमधली आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs South Africa 2nd Test) त्याने 61 रन देऊन 7 विकेट मिळवल्या आहेत. जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स मैदानातली भारतीय बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आपल्या करियरमधली सहावी टेस्ट खेळणाऱ्या शार्दुलने पहिल्यांदाच 5 विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. याआधी 61 रनमध्ये 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 202 रन केले होते, पण शार्दुलच्या शानदार बॉलिंगमुळे दक्षिण आफ्रिकेचा 229 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे त्यांना फक्त 27 रनचीच आघाडी घेता आली.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Shardul Thakur

    पुढील बातम्या