India vs South Africa : 'आज दारू तुम्हारा भाई पिलायेगा’, सामना जिंकण्याआधीच रवी शास्त्रींचं ट्विटरवर सेलिब्रेशन

India vs South Africa : 'आज दारू तुम्हारा भाई पिलायेगा’, सामना जिंकण्याआधीच रवी शास्त्रींचं ट्विटरवर सेलिब्रेशन

आयसीसीनं शेअर केलेल्या शास्त्रींच्या फोटोला नेटकऱ्यांनी केलं जबरदस्त ट्रोल.

  • Share this:

पुणे, 13 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0नं आघाडी घेतली आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यातही भारताची आफ्रिका संघावर मजबूत पकड आहे. पहिल्या डावात 275 धावांवर ऑलआऊट केल्यानंतर भारतानं आफ्रिकेला फॉलोऑन दिला आहे. यातही आफ्रिकेनं पाच विकेट गमावले आहेत. त्यामुळं या सामन्यातही भारताचा विजय जवळजवळ निश्चित आहे. या सामन्यात विजयासह भारतीय संघ मालिकेतवरही गब्जा करेल.

दरम्यान, या सामन्याआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा एक फोटो आयसीसीनं अपलोड केला होता. या फोटोमध्ये शास्त्री दोन्ही हात लांब करत रिलॅक्स मोडमध्ये दिसत आहेत. यावर आयसीसीनं या फोटोला कॅप्शन द्या असे सुचवले, त्यानंतर नेटकऱ्यांनी दिलेले कॅप्शन वाचून तुम्हाला हसु आवरता येणार नाही. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या फोटोला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

या फोटोवर एका युझरनं, कभी कभी लगता है अपुनही बॉस है, असे कॅप्शन लिहीले आहे.

एकानं तर शास्त्री टॉनी स्टार्क असल्याचा फोटो टाकला होता.

तर, एकानं आज तेरा भाई दारू पिलायगा, असे कॅप्शन लिहिले आहे.

मेरे पास विराट है, बुमराह है, रोहित है, तुम्हारे पास क्या है?

याआधीही हातात दारूची बॉटल घेऊन रवी शास्त्रींनी फोटो टाकला होता. तेव्हा नेटकऱ्यांनी दारूडा म्हणून शास्त्रींना ट्रोल केले होते.

VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

Published by: Priyanka Gawde
First published: October 13, 2019, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading