India vs South Africa : जडेजाची जादू! अपील न करताच अम्पायरनं फलंदाजाला केले बाद, पाहा VIDEO

खेळाडूंनी अपील न करताही पंचांनी फलंदाजाला बाद केले. पाहा हा मजेशीर व्हायरल व्हिडीओ.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 01:51 PM IST

India vs South Africa : जडेजाची जादू! अपील न करताच अम्पायरनं फलंदाजाला केले बाद, पाहा VIDEO

पुणे, 13 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं आफ्रिकेला डोकं वर काढण्यासाठी जागा दिली नाही. पहिल्या दिवशी टीम इंडियानं 601 धावांचा डोंगर उभारल्यानंतर आफ्रिकेला 275 धावांवर बाद करत फॉलोऑन दिला. त्यानंतर आफ्रिकेला सामना जिंकण्याची कोणतीही संधी टीम इंडियानं दिली नाही.

सामन्याच्या चौथ्या दिवशी अनेक मजेशीर प्रसंग घडले. यात अजिंक्य रहाणे आण वृध्दीमान साहा यांनी उत्कृष्ठ झेल पकडले. मात्र, या सगळ्यात चर्चा झाली ती रविंद्र जडेजाच्या जबरदस्त गोलंदाजीची. पहिल्या दिवशी विराट कोहलीसोबत शतकी भागिदारी करत 91 धावा केलेल्या जडेजानं गोलंदाजीमध्येही कमाल केली. तिसऱ्या दिवशी मुथुस्वामी फलंदाजी करत असताना जडेजानं ऑफ स्टम्पजवळ चेंडू टाकला. हा चेंडू फिरून फलंदाजाच्या पॅडला लागला. मात्र खेळाडूंनी चेंडू बाहेर गेला असे समजून अपील केले नाही मात्र, पंचांनी तरी फलंदाजाला बाद घोषित केले.

वाचा-'आज दारू तुम्हारा भाई पिलायेगा’, सामना जिंकण्याआधीच रवी शास्त्रींचं सेलिब्रेशन

त्यानंतर मुथुस्वामीनं रिव्ह्युही घेतला, मात्र निर्णय पक्षांच्या बाजूनं लागला. आफ्रिकेच्या पहिल्या डावात हा प्रकार घडला. चौथ्या दिवशी आफ्रिकेला संघाला फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर इशांत शर्मानं मार्कमला माघारी धाडले. एल्गार, टेम्बा यांच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करत आली नाही. कणधआर फाफ ड्यु प्लेसिसही केवळ 5 धावा करत बाद झाला. भारताला विजयासाठी आता फक्त तीन विकेटची गरज आहे.

वाचा-VIDEO : पंत काहीतरी शिक, साहाच्या अफलातून झेलनंतर नेटकऱ्यांचा सल्ला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत पहिल्यांदाच कोणत्याही भारतीय कर्णधाराने पाहुण्या संघाला फॉलोऑन दिला आहे. विराट दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताला सर्वाधिक कसोटी जिंकून देणाऱ्या मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, महेंद्र सिंग धोनी या कर्णधारांनाही अशी कामगिरी करता आली नव्हती. गेल्या दहा वर्षात आफ्रिकेला कोणत्याही संघाने फॉलोऑन दिला नव्हता.

वाचा-भारतीय गोलंदाजांचं 259 चेंडूत 'वस्त्रहरण', 18 वर्षांनी लाजिरवाणा विक्रम

VIDEO : पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान गोंधळ; घोषणाबाजी करणारे आंदोलक ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2019 01:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...