India vs South Africa : मयंक अग्रवालचं शानदार शतक, मोडला सेहवागचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम

India vs South Africa : मयंक अग्रवालचं शानदार शतक, मोडला सेहवागचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम

184 चेंडूत मयंकनं 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 104 धावा केल्या.

  • Share this:

पुणे, 10 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा मयंक अग्रवालनं शानदार खेळी केली. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या मयंकनं या सामन्यातही शतकी खेळी केली. 184 चेंडूत मयंकनं 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 104 धावा केल्या. पहिल्या सामन्यात दुहेरी शतक केलेल्या मयंकनं दुसऱ्या सामन्यातही दणक्यात खेळी केली.

तत्पूर्वी, भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताला 10व्या ओव्हरमध्येच पहिला झटका बसला. रोहित शर्मा फक्त 14 धावा करत बाद झाला. त्यानंतर पुजारा आणि मयंकनं शतकी भागिदारी केली. मात्र पुजारा अर्धशतकी खेळी करत बाद झाला. मयंकनं या सामन्यातही आक्रमक आणि संयमी खेळीचे योग्य प्रदर्शन केले.

मयंक अग्रवालनं आपल्या शतकासह विरेंद्र सेहवागच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सेहवागनं 2009मध्ये सलामीचा फलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिका विरोधात सलग शतकी खेळी करण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर आता मयंकनं अशी कामगिरी केली आहे. याआधी पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात मयंकनं 215 धावांची खेळी केली होती.

भारताकडे विक्रम करण्याची संधी

दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरेल. भारताने घरच्या मैदानावर खेळताना 10 कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी भारताकडे आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन वेळा घरच्या मैदानावर सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर भारताने 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकून भारत विश्वविक्रम करू शकतो. भारताने फेब्रुवारी 2013 पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.

VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

Published by: Priyanka Gawde
First published: October 10, 2019, 2:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading