India vs South Africa 2nd test : सेहवागचा सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा फक्त एक पाऊल दूर

रोहित शर्मा एका कसोटी सामन्यात 9 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार करणारा पहिला भारतीय फलंदाज ठोकला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2019 10:52 AM IST

India vs South Africa 2nd test : सेहवागचा सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा फक्त एक पाऊल दूर

पुणे, 10 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यात भारतानं 203 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्माची खेळी विशेष लक्षणीय ठरली. दोन्ही डावांमध्ये रोहितनं शतकी कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे रोहितनं एकूण 28 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 27 सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. दक्षिण आफ्रिका विरोधात पहिल्यांदाच रोहित सलामीला उतरला आणि त्यानं 303 धावा केल्या.

विशाखापट्टणममध्ये रोहित पहिल्यांदा सलामीसाठी फलंदाजीला उतरला. त्यामुळं आता दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 13 षटकार लगावले होते. एका सामन्यात सर्वात जास्त षटकार लगावण्याचा विक्रम रोहितनं केला होता. मात्र विरेंद्र सेहवागचा एक रेकॉर्ड मात्र रोहितला मोडता आलेला नाही. पण सेहवागचा हा रेकॉर्ड मोडण्याच्या खुप जवळ रोहित आला आहे.

सेहवागचा सर्वात रेकॉर्ड मोडणार रोहित

दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात सर्वात जास्त षटकार लगावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. सेहवागनं 15 कसोटी सामन्यात 17 षटकार लगावले आहेत. तर, रोहित शर्मानं 7 कसोटी सामन्यात 16 षटकार लगावले आहेत. त्यामुळं रोहित शर्माला सेहवागचा रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त 2 षटकारांची गरज आहे. त्यामुळं पुण्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित हा रेकॉर्ड मोडू शकतो.

वाचा-‘रोहितबाबत मला काही विचारू नका’, पत्रकार परिषेदत एका प्रश्नावरून भडकला विराट

Loading...

या फलंदाजांनी लगावले सर्वात जास्त रेकॉर्ड

विरेंद्र सेहवाग- 15 कसोटी सामने, 17 षटकार

रोहित शर्मा- 7 कसोटी सामने, 16 षटकार

अजिंक्य रहाणे- 8 कसोटी सामने, 11 षटकार

जहीर खान- 12 कसोटी सामने, 9 षटकार

सचिन तेंडुलकर- 25 कसोटी सामने 9 षटकार

वाचा-टेस्ट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अव्वल, तरी ICCवर बरसला कॅप्टन कोहली

रोहित शर्मा ठरला षटकारांचा बादशाह

रोहित शर्मा एका कसोटी सामन्यात 9 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणार पहिला भारतीय फलंदाज ठोकला आहे. रोहितनं या सामन्यात एकूण 13 षटकार लगावले. रोहितने पहिल्या डावात शतकी खेळी करताना 6 षटकार ठोकले होते. दुसऱ्या डावात 7 षटकार खेचले आहेत. यासह रोहितने सिद्धू यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला. सिद्धू यांनी 1994मध्ये लखनौ कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 8 षटकार ठोकले होते. तसेच, याआधी पाकिस्तानच्या वसीम अक्रमनं एका कसोटी सामन्यात 12 षटकार ठोकले होते. याचसोबत कसोटी, टी-20 आणि वन-डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे.

वाचा-IND vs SA : टीम इंडियाला पुण्यात इतिहास घडवण्याची संधी, करणार विश्वविक्रम?

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 08:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...