India vs South Africa : फिरकीचा नवा किंग! कुंबळे-भज्जीच्या क्लबमध्ये सामिल झाला अश्विन

India vs South Africa : फिरकीचा नवा किंग! कुंबळे-भज्जीच्या क्लबमध्ये सामिल झाला अश्विन

भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात 10 महिन्यांनी टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या अश्विननं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.

  • Share this:

पुणे, 13 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात 10 महिन्यांनी टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या अश्विननं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. पुण्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा डाव 275 धावांवर संपला. यात डावात अश्विननं सर्वात जास्त 4 विकेट घेतल्या. यासह अश्विननं आपल्या नावावर एक खास रेकॉर्ड केला आहे.

पुण्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात अश्विननं पहिल्या डावात 4 विकेट घेतल्या. यासह त्यानं कुंबळ आणि हरभजन सिंग यांच्या पंक्तित स्थान मिळवले आहे. अश्विनच्या फिरकीपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. त्यामुळं भारताला 326 धावांची आघाडी मिळाली. यासह अश्विननं हरभजन सिंगला मागे टाकत आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे. अश्विननं आफ्रिकेविरोधात सर्वात जास्त चार विकेट घेतले आहे. याआधी भज्जीनं आफ्रिकेविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये सातवेळा अशी कामगिरी केली होती. तर, अश्विननं आठ वेळा ही कामगिरी केली आहे.

वाचा-टीम इंडियाची सुरक्षा वाऱ्यावर! चाहत्यानं भरमैदानात रोहितच्या अंगावर मारली उडी

अश्विननं या कसोटी सामन्यात सर्वात कमी सरासरीनं धावा देत विकेट घेतल्या. त्यानं 28.4च्या सरासरीनं 69 धावा देत 4 विकेट घेतल्या, दरम्यान मालिकेच्या पहिल्या सामन्यात अश्विननं 8 विकेट घेतल्या होत्या. या कसोटी सामन्यात अश्विननं आतापर्यंत 13 विकेट घेतल्या आहेत.

वाचा-आधी टीम इंडियानं नाकारलं; आता लगावले विराट, रोहितपेक्षा जलद द्विशतक

अश्विननं पूर्ण केल्या 50 विकेट

या मालिकेत अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट पूर्ण केल्या. सर्वात जलद 50 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आता चौथ्या क्रमांकावर आहे. अश्विनच्याआधी तीन भारतीय गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. कसोटीमध्ये अनिल कुंबळेनं दक्षिण आफ्रिकाविरोधात सर्वात जास्त विकेट घेतल्या आहेत. कुंबळेनं 21 कसोटी सामन्यात 84 विकेट घेतल्या आहेत. तर, जवागल श्रीनाथनं 13 सामन्यात 64 विकेट घेतल्या आहे. हरभजन सिंगनं 11 कसोटी सामन्यात 60 विकेट घेतल्या आहे. अश्विननं सर्वात जलद फक्त 9 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे.

वाचा-चाहत्यांसाठी खुशखबर! निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार धोनी

कुस्ती 'अशां'सोबत होत नाही, हातवारे करून पवारांनी फडणवीसांना फटकारले, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: r ashwin
First Published: Oct 13, 2019 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading