304 दिवसांचा दुष्काळ संपला! विराटच्या एका शतकानं दिग्गज पिछाडीवर

विराटनं तब्बल 10 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतकी कामगिरी केली.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 12:44 PM IST

304 दिवसांचा दुष्काळ संपला! विराटच्या एका शतकानं दिग्गज पिछाडीवर

पुणे, 11 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रन मशीन विराट कोहलीनं कमाल कामगिरी केली. विराटनं तब्बल 10 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतकी कामगिरी केली. विराटच्या शतकासह भारतानं पुण्यातील कसोटी सामन्यातही आपला दबदबा कायम ठेवला आहे.

विराटनं या कसोटी सामन्यात आपल्या करिअरचे 26वे शतक केले. या शतकासह विराटनं आपला प्रतिस्पर्धी स्टिव्ह स्मिथच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पहिल्या दिवशी विराटनं 63 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विराटनं अजिंक्य रहाणेसोबत आक्रमक खेळी करत भारताला 300चा आकडा पार करून दिला. दरम्यान विराटनं 173व्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. विराटनं आपल्या खेळीत 16 चौकार लगावले. विराटचे हे मायदेशातील मैदानावर 12वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण 69वे शतक ठरले.

विराटनं 2018मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात अखेरची शतकी खेळी केली होती. त्यानंतर विराटनं आज ही कामगिरी केल आहे. तब्बल 10 डावांनंतर विराटनं पुन्हा ही कामगिरी केली आहे.

दिग्गजांची केली बरोबरी

Loading...

विराटनं आपल्या शतकाच्या बळावर कमी डावात 26 कसोटी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला. या यादीत ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन (69) अव्वल, स्टीव्ह स्मिथ (121) आणि सचिन तेंडुलकर (136) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दिग्गजांना टाकले मागे

10 महिन्यांनंतर शतकी कामगिरी केलेल्या विराटनं अनेक दिग्गजांना मागे टाकण्याची कामगिरी केली आहे. विराट फक्त डॉन ब्रॅडमन यांच्या मागे आहे. त्याचबरोबर स्टिव्ह स्मिथ, माजी विंडीज फलंदाज गॅरी सोबर्स यांच्याशीही बरोबरी साधली. या दोघांच्या नावावरही कसोटी क्रिकेटमध्ये 26 शतकांची नोंद आहे. तसेच, या खेळीदरम्यान विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार 900 धावांचा टप्पा ओलांडत माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांना मागे टाकले.

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...