India vs South Africa : आफ्रिकेची चाणाक्यनिती, भारताविरोधात KKRच्या खेळाडूला दिलं संघात स्थान

India vs South Africa : आफ्रिकेची चाणाक्यनिती, भारताविरोधात KKRच्या खेळाडूला दिलं संघात स्थान

पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव मिळालेल्या आफ्रिकेनंही संघात बदल केले आहेत.

  • Share this:

पुणे, 10 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पुण्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान 50वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराटनं संघात एक मोठा बदल केला. हनुमा विहारीच्या जागी जलद गोलंदाजी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले. दुसरीकडे पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव मिळालेल्या आफ्रिकेनंही संघात बदल केले आहेत. त्यांनी डेन पिएडला बाकावर बसवत 25 व४ला संधी दिली आहे. नॉर्तेजे आफ्रिकेकडून पदार्पण करणारा 337वा खेळाडू ठरला आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं कर्णधार फाफ ड्युप्लेसिसनं संघात बदल केले. 25 वर्षीय अॅनरिच नॉर्तेजेहा त्याच्या जलद गोलंदाजीसाठी ओळखला जातो. 145 किमी वेगानं गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. मार्च 2019मध्ये त्यानं दक्षिण आफ्रिका संघाकडून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला वर्ल्ड कप 2019मध्ये संघात स्थान दिले, मात्र दुखापतीमुळं त्यानं माघार घेतली.

वाचा-India vs South Africa : दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

वाचा-विराटला प्रतिस्पर्धी संघाची नाही तर आपल्याच खेळाडूंची वाटली भिती

नॉर्तेजेनं आयपीएलमध्येही आपली कमाल दाखवली आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या नॉर्तेजेला 20 लाखात केकेआर संघानं आपल्या चमुत सामिल केले होते. नॉर्तेजेनं 47 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्यानं 25.72च्या सरासरीनं 162 विकेट घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा संघ- डीन अल्गर, अॅडेन मार्करम, थ्युनिस डिब्रून, फाफ डुप्लेसिस, तेंबा बावुमा, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), केशव महाराज, सेनुरन मुथ्थुसामी, वर्नोन फिलेंडर, अॅनरिक नॉर्तेजे आणि कॅगिसो रबाडा.

भारताचा संघ- मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, आर अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.

वाचा-क्रिकेटच्या मैदानात धोनीला मिस करताय? पाहा स्टम्पिंगचा हा तुफानी VIDEO

VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2019 12:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading