पुण्यातील मुसळधार पावसामुळं टीम इंडियाला धोका, हा आहे हवामानाचा अंदाज

परतीच्या पावसानं महाराष्ट्राला झोडपले असताना पुण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2019 07:05 PM IST

पुण्यातील मुसळधार पावसामुळं टीम इंडियाला धोका, हा आहे हवामानाचा अंदाज

पुणे, 09 ऑक्टोबर : परतीच्या पावसानं महाराष्ट्राला झोडपले असताना पुण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान पाऊस थांबला नाही तर, गुरुवारी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्याला मोठा फटका बसणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं 203 धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0नं आघाडी घेतली आहे. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप(World Test Championship)मध्ये दोन्ही संघ स्वत:चे स्थान बळकट करण्याच्या हेतूने दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरतील. पण पुण्यात या दोन्ही संघांसमोर एकमेकांचे नव्हे तर हवामानाविरुद्ध लढण्याचे आव्हान असणार आहे. सध्या पुण्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं सामना होणार का याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

हवामान विभागाने पुण्यात वादळाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळेच सामना वेळेत सुरु झाला तर सर्वांसाठी आश्चर्यच असेल. मैदान व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार पाऊस थांबल्यानंतर 15 ते 20 मिनिटात सामना पुन्हा सुरु होऊ शकतो. पण हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुण्यात दिवसभर पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसामुळे कसोटी रद्द झाली तर दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने मोठा फटका बसू शकतो.

वाचा-...तरच आशियाई कपमध्ये होणार भारत-पाक सामना, BCCIने घातली अट

वाचा-‘रोहितबाबत मला काही विचारू नका’, पत्रकार परिषेदत एका प्रश्नावरून भडकला विराट

Loading...

पुण्यातील सामना जर ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 13 गुण मिळतील. याउटल एखाद्या संघाने सामना जिंकला तर त्या संघाला 40 गुण मिळतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे नियमच असे करण्यात आले आहेत की प्रत्येक सामना हा महत्त्वाचा ठरतो. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात स्वच्छ वातावरण आहे. पण येत्या काळात पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात पावसामुळे सामना झाला नाही तर भारतीय संघाचे फार मोठे नुकसान होणार नाही. असे असले तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरतो.

वाचा-टेस्ट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अव्वल, तरी ICCवर बरसला कॅप्टन कोहली

वाचा-टी-20 वर्ल्ड कपआधी धोक्याची घंटा, हुकुमी खेळाडूंची दुखापत संघासाठी डोकेदुखी

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2019 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...