पुणे, 12 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसऱ्या सामन्यात भारताची मजबूत पकड आहे. आफ्रिकेचा संघ 275 धावांवर बाद झाल्यामुळं भारताकडे आता तब्बल 326 धावांची आघाडी आहे. भारताकडून अश्विननं सर्वात जास्त 4 विकेट घेतल्या. पहिल्या डावात विराट आणि मयंकनं तुफानी फलंदाजी केल्यानंतर आफ्रिकेचे फलंदाज अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. तरी, गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशव महाराजनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केशवच्या 72 धावांच्या खेळीमुळं आफ्रिकेनं 275 धावांपर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवसाच्या अंती भारतानं चांगली गोलंदाजी करत 275 धावांवर बाद केले.
दरम्यान, दुसऱ्य़ा दिवशी 36 धावांवर तीन विकेट गमावलेल्या आफ्रिकेला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र कर्णधार फाफ ड्युप्लेसिसनं आफ्रिकेचा डाव सावरण्याच प्रयत्न केला. ड्यु प्लेसिस णि क्विंटन डी कॉक यांच्या अर्धशतकी भागिदारीनं आफ्रिकेला सावरले. त्यानंतर डी कॉकला 31 धावांवर अश्विननं माघारी धाडले. अष्टपैलु मुथुस्वामीलाही चांगली कामगिरी करता आली नाही. जडेजानं त्याला बाद केले. त्यानंतर कर्णधार ड्युप्लेसिसला अश्विननं माघारी धाडले. केशव महाराज आणि फिलेंडर यांनी चांगली खेळी करत डाव सांभळला. अखेर केशवला अश्विननं 72 धावांवर बाद केले.
तिसऱ्या दिवशी भारताकडून अश्विननं 4, उमेश यादव 3, शमीनं 2 तर जडेजानं एक विकेट घेतली.
Stumps on Day 3 with South Africa fighting back owing to a century stand from Maharaj & Philander. R Ashwin picks 4. SA 275 all out #TeamIndia #INDvSA @Paytm pic.twitter.com/jrBGcPEWW4
— BCCI (@BCCI) October 12, 2019
दरम्यान, पुण्यातील सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 601 धावांवर डाव घोषित केला. यात विराटनं शानदार खेळी करत तब्बल 1 वर्षांनंतर द्विशतक केले. त्याआधी मयंक अग्रवालनं शतकी कामगिरी केली होती. दरम्यान भारतानं डाव घोषित केल्यानंतर आफ्रिकेला चांगली फलंदाजी करता आली नाही. आफ्रिकेचा संघ दबावात दिसला. उमेश यादवनं दुसऱ्याच दिवशी सलामीवीरांचा मागे धाडले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी शमी, अश्विननं मिळून 5 विकेट घेतल्या. त्य़ामुळं आफ्रिकेचा संघ सध्या अडचणीत दिसत आहे तर भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे.
दुसरी सर्वात जास्त आघाडी
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात भारतानं 326 धावांची आघाडी मिळवली आहे. ही भारताची दुसरी सर्वात मोठी आघाडी आहे. याआधी दिल्लीत 2015-16मध्ये भारतानं 213 धावांची आघाडी मिळवली होती. तर 2009-10मध्ये भारतानं सर्वात जास्त म्हणजे 247 धावांची आघाडी मिळवली होती. दरम्यान भारतानं हे सर्व सामने जिंकले होते. त्यामुळं या सामन्यावरही भारताची पकड असणार आहे.
केशव महाराजचं करिअरमधलं पहिले अर्धशतक
भारताविरोधात पदार्पण करणाऱ्या केशव महाराजला त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखले जाते. मात्र या सामन्यात त्यानं फलंदाजीनं कमाल केली. संघाला गरज असताना केशवनं अर्धशतकी खेळी केली. 96 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीनं केशवनं आपले अर्धशतक पूर्ण केले. याआधी केशवची सर्वेश्रेष्ठ धावसंथ्या 45 होती.
कुस्ती 'अशां'सोबत होत नाही, हातवारे करून पवारांनी फडणवीसांना फटकारले, पाहा हा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा